TRENDING:

काम देण्याच्या मुद्द्यावर राजपाल यादवचा सोनू सूदला टोला; अभिनेत्यानेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला 'मला त्यांच्यासाठी...'

Last Updated:
Rajpal Yadav Controversy: संकटकाळात ज्या अभिनेत्याने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला, त्याच सोनू सूदवर राजपाल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. अशातच सोनू सूदनेही आपली बाजू मांडली आहे.
advertisement
1/9
राजपाल यादवचा सोनू सूदला सणसणीत टोला; अभिनेत्यानेही दिलं सडेतोड उत्तर
मुंबई : ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेले बॉलिवूडचे दिग्गज कॉमेडियन राजपाल यादव सध्या एका वेगळ्याच वादाचे केंद्र बनले आहेत.
advertisement
2/9
संकटकाळात ज्या अभिनेत्याने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला, त्याच सोनू सूदच्या विधानावर राजपाल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. "मला कोणाकडे काम मागण्याची गरज नाही," अशा शब्दांत राजपाल यांनी सोनूच्या मदत करण्याच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
3/9
राजपाल यादव तुरुंगात असताना सोनू सूदने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली होती. त्याने चित्रपट निर्मात्यांना आवाहन केलं होतं की, "राजपाल यादव हे सिनेसृष्टीला मिळालेलं वरदान आहेत. त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांना साइन करा आणि सायनिंग अमाऊंट द्या, हे दान नाही तर सन्मान आहे."
advertisement
4/9
मात्र, तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादव यांनी या मदतीच्या दाव्यावर संताप व्यक्त केला. एका मुलाखतीत ते म्हणाले, "कृपया हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की मला काम मागावं लागतं. काम मागण्यात मला लाज वाटत नाही, पण गेल्या २६ वर्षांपासून काम माझ्यासोबत चालत आलं आहे. माझ्याकडे कामाची अजिबात कमी नाही. मी सुट्ट्यांच्या दिवशीही काम करतो, इतके प्रोजेक्ट्स माझ्या हातात आहेत."
advertisement
5/9
राजपाल यादव यांनी आपल्या आर्थिक स्थितीबद्दल बोलताना सर्वांनाच थक्क केलं. त्यांनी स्वतःला '१५०० कोटींचा माणूस' असं संबोधलं आहे. राजपाल यांचा दावा आहे की, पुढील ७ वर्षांसाठी त्यांच्याकडे १२०० कोटी रुपयांचे ब्रँडिंग प्रोजेक्ट्स आहेत.
advertisement
6/9
सध्या त्यांच्याकडे १० चित्रपट रांगेत आहेत. यात अक्षय कुमारसोबतचा 'भूत बंगला', २७ कलाकारांचा समावेश असलेला 'वेलकम टू द जंगल' आणि 'हैवान' यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.
advertisement
7/9
राजपाल यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सोनू सूदनेही आपली बाजू मांडली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना सोनू म्हणाला, "मला त्यांच्यासाठी आनंदच आहे. मी कधीच असं म्हटलं नाही की त्यांना कामाची गरज आहे. मी फक्त निर्मात्यांना सांगितलं होतं की त्यांना साइन करा आणि ॲडव्हान्स पेमेंट द्या, कारण ते त्या सन्मानाचे आणि कामाचे हक्कदार आहेत." सोनूच्या मते, त्याने केवळ एका सहकाऱ्याच्या कठीण काळात इंडस्ट्रीला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.
advertisement
8/9
२०१० मध्ये राजपाल यादव यांनी त्यांच्या 'अता-पता लापता' या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत आणि प्रकरण कोर्टात गेलं.
advertisement
9/9
२०१२ पासून सुरू असलेल्या या वादात चेक बाऊन्स झाल्यामुळे राजपाल यांना तुरुंगाची शिक्षा झाली होती. सध्या त्यांना १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काम देण्याच्या मुद्द्यावर राजपाल यादवचा सोनू सूदला टोला; अभिनेत्यानेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला 'मला त्यांच्यासाठी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल