TRENDING:

Rajashri Deshpande : 'आजचा दिवस फक्त...' कॅन्सरशी लढणाऱ्या राजश्री देशपांडेची इमोशनल पोस्ट, हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर

Last Updated:
Rajshri Deshpande : अभिनेत्री राजश्री देशपांडे कॅन्सर सारख्या आजारावर उपचार घेत आहे. उपचार सुरू असताना राजश्रीनं एक इमोशन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
1/8
'आजचा दिवस फक्त...' कॅन्सरशी लढणाऱ्या राजश्री देशपांडेची इमोशनल पोस्ट, हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर
आपल्या अभिनयानं मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे. काही दिवसांआधी अभिनेत्रीबाबत धक्कादायक माहिती समोर आली. अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्यावर उपचार सुरू असून तिनं हॉस्पिटल बेडवरील फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
2/8
कॅन्सरच्या उपचारांदरम्यान सुरू असलेल्या घडामोडी, शारीरिक-मानसिक आणि भावनिक त्रासाबद्दल सांगितलं. तसंच ती रिकव्हर होत असल्याची अपडेट देखील दिली.
advertisement
3/8
राजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल समजलं... आजही मला तो क्षण आठवतो हॉस्पिटलमधील हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट सेंटरच्या बाहेर मी एकटीच उभी होते. मी कोसळले होते. मी त्यावेळी मजबूत राहू शकले नाही. माझ्यात ताकदच उरली नव्हती."
advertisement
4/8
"आजही लोक विचारतात, तुलाच कसं झालं? तू तर इतकी फिट आहेस. पण खरं सांगायचं तर माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. हा त्रास फक्त शारीरिक नव्हता, तर मानसिक आणि भावनिक वेदनाही असह्य होत्या."
advertisement
5/8
राजश्रीनं पुढे लिहिलंय, "मी अनेक वेळा तुटून पडले. कधी एकटी, तर कधी माझ्या मित्रांसमोर, ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला सावरलं. पण असेही अनेक दिवस होते जेव्हा मी पुन्हा उभी राहिले आणि हार मानली नाही."
advertisement
6/8
"काही दिवस असे असतात जेव्हा मला जगातील सगळी ताकद दाखवायची नसते. मला फक्त शांत बसायचं असतं. मेरी ऑलिव्हरच्या कवितेतल्या त्या चिमण्यांसारखं. ज्या माझ्या खिडकीजवळच्या बोगनवेलवर बसून माझ्यासोबत सनराइज पाहतात."
advertisement
7/8
"मी जर आनंदाने उठून हसणं यालाच एक यश म्हणू शकते, आज मी ते साध्य केलं. आज मी स्वतःसाठी एक हसू आणि एक मिठी मिळवली.  या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांचा विचार केला, ज्यांनी फोन केला, मेसेज केले आणि मला खूप प्रेम दिलं."
advertisement
8/8
"मला माहिती आहे उद्या पुन्हा लढाया असतील. त्यासाठी तयारी करावी लागेल. पण आजचा दिवस फक्त प्रेमाचा असू दे… प्लिज", असंही राजश्रीनं लिहिलंय. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rajashri Deshpande : 'आजचा दिवस फक्त...' कॅन्सरशी लढणाऱ्या राजश्री देशपांडेची इमोशनल पोस्ट, हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल