Bigg Boss 19 मध्ये राखी सावंतची एन्ट्री? ड्रामा क्वीन स्पष्टच म्हणतेय,"मला वोट करा"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rakhi Sawant on Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये 'ड्रामा क्वीन' राखी सावंतची एन्ट्री होऊ शकते. अभिनेत्रीने स्वत: याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

राखी सावंत दुबईहून भारतात परतली असून ती सलमान खानच्या 'बिग बॉस 19' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी होऊ शकते.
advertisement
2/7
राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 'ड्रामा क्वीन' म्हणतेय,"मी 'Bigg Boss'च्या घरात जात आहे. मला व्होट करा.
advertisement
3/7
राखी सावंत पुन्हा एकदा 'बिग बॉस'चं घर गाजवणार असल्याने चाहते मात्र उत्सुक आहेत. पण अद्याप याबाबत अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नाही.
advertisement
4/7
राखी सावंत बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर कोणासोबत पंगा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
advertisement
5/7
टीआरपी वाढविण्यासाठी राखीला बिग बॉसमध्ये घेत आहेत, राखी तान्या मिल्लसोबत पंगा घेणार, राखीचा विषयच हार्ड आहे, अशा कमेंट्स नेटकरी राखी सावंतच्या व्हायरल व्हिडीओवर करत आहेत.
advertisement
6/7
राखी सावंत याआधी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. तसेच 'बिग बॉस 14' आणि 'बिग बॉस 15'मध्येही राखीचा हटके स्वॅग पाहायला मिळाला आहे.
advertisement
7/7
राखी सावंत स्वत:ला बिग बॉसची बायको समजते. आता ड्रामा क्वीन खरंच बिग बॉसच्या घरात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 मध्ये राखी सावंतची एन्ट्री? ड्रामा क्वीन स्पष्टच म्हणतेय,"मला वोट करा"