TRENDING:

Bigg Boss Marathi गाजवायला येतेय राखी सावंत! सीझन 6 च्या स्पर्धकानेच केलं कन्फर्म

Last Updated:
Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 6 : अभिनेत्री आणि ड्रामाक्विन राखी सावंत बिग बॉस मराठी 6 मध्ये येणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. सीझन 6 च्याच स्पर्धकाने याबाबत मोठी अपडेट दिलीये.
advertisement
1/9
Bigg Boss Marathi गाजवायला येतेय राखी सावंत! सीझन 6च्या स्पर्धकानेच केलं कन्फर्म
बिग बॉस मराठी 6 सुरू आहे. घरात गेलेले सतरा स्पर्धक घरात धिंगाणा घातल आहेत.  टास्क, वाद, रणनीती आणि मनोरंजन यामुळे घरात अक्षरशः धिंगाणा सुरू आहे.
advertisement
2/9
प्रेक्षकांचा उत्साह वाढलेला असतानाच बिग बॉस मराठी 6 संबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रेक्षकांची मनोरंजन आता दुप्पट होणार आहे. कारण अभिनेत्री ड्रामाक्विन राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात जाणार आहे. सीझन 6 च्याच स्पर्धकानं ही कन्फर्म माहिती दिली आहे. 
advertisement
3/9
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील स्पर्धक सोनाली राऊत हिने एका मुलाखतीत राखी सावंतच्या एन्ट्रीची कन्फर्म माहिती दिली. बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंतची एन्ट्री होणार आहे. 
advertisement
4/9
नवशक्तिशी बोलताना सोनाली राऊत म्हणाली, "मला 100 % खात्री आहे की यावेळेस राखी सावंत येणार. कारण मी ऐकलं की तिला बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा जायचं आहे, वाईल्ड कार्ड किंवा गेस्ट म्हणून. त्यामुळे 100 % चान्स आहे की ती येऊ शकते."
advertisement
5/9
"ती खूप चांगली आहे. मी जेव्हा बिग बॉस 8 मध्ये गेलेल तेव्हा तिने मला खूप सपोर्ट केला होता. त्यानंतर आम्ही खूप इव्हेंट्स, शो आणि परफॉर्मन्सेस केले तेव्हा ती मला भेटत असते."
advertisement
6/9
सोनाली पुढे म्हणाली, "ती खूप एन्टरटेनिंग आहे. खूप फनी आहे. मी आताही तिचे व्हायरल व्हिडीओ पाहते. तिचा तो एक डायलॉग आहे. कोई लडे, मरे, आवाज निचे बीस कदम पिछे. तिचा हाच डायलॉग 2026 चा मंत्रा हवा."
advertisement
7/9
तुझा मंत्राही तोच असणार आहे का असं विचारलं असता सोनाली म्हणाली, "नाही, आवाज नीचे और में बीस कदम आगे हा माझा मंत्रा असणार आहे."
advertisement
8/9
आता राखी सावंत खरंच बिग बॉस मराठी 6 मध्ये येते का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जर तिची एंट्री झाली तर हा सीझन नक्कीच अधिक धमाकेदार ठरणार यात शंका नाही.
advertisement
9/9
राखी याआधी बिग बॉस मराठी चारमध्ये आली होती. या सीझनमध्ये राखीने चांगलाच धिंगाणा घातला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी 5 मध्येही राखीने गेस्ट एन्ट्री घेतली होती. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi गाजवायला येतेय राखी सावंत! सीझन 6 च्या स्पर्धकानेच केलं कन्फर्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल