213 रन्स ठोकणाऱ्या दिल्लीच्या खेळाडूवर BCCI कडून कारवाईचा बडगा, Mumbai Indians विरूद्धच्या सामन्यात काय झालं होतं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
DC vs MI WPL 2026 Lizelle Lee fined : बई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लिजेल लीच्या मॅच फीमधून 10 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाणार असून तिच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जमा झाला आहे.
advertisement
1/7

महिला प्रीमियर लीगमध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्सची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आली आहे, कालच्या मॅचमध्ये दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे आता मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न आणखी लांबलं आहे.
advertisement
2/7
अशातच दिल्लीच्या स्टार खेळाडूवर कारवाई करण्यात आलीये. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लिजेल लीच्या मॅच फीमधून 10 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाणार असून तिच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जमा झाला आहे.
advertisement
3/7
वडोदरा येथील BCA स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या मॅचमध्ये दिल्लीच्या इनिंगमधील 11 व्या ओव्हरमध्ये हा वाद निर्माण झाला. मुंबईची बॉलर अमनजोत कौर हिच्या बॉलवर लिजेल ली स्टंप आऊट झाली.
advertisement
4/7
हा निर्णय अत्यंत क्लोज असल्याने थर्ड अंपायरने अनेक अँगलने तपासणी केली आणि अखेर लिजेल लीची बॅट हवेत असल्याचे स्पष्ट करत तिला आऊट दिले. या निर्णयावर लिजेलने मैदानातच नाराजी व्यक्त केली, जी नियमांच्या विरोधात होती.
advertisement
5/7
लिजेल ली या सीझनमध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये असून ती 28 बॉलमध्ये 46 रन करून खेळत होती. आपल्या आणखी एका अर्धशतकाच्या जवळ असताना आऊट दिल्याने तिचा संयम सुटला आणि तिने अंपायरच्या निर्णयावर जाहीर नाराजी दर्शवली.
advertisement
6/7
डब्ल्यूपीएलच्या आचारसंहितेनुसार, लेव्हल 1 अंतर्गत हा गुन्हा मानला जातो. लिजेलने नंतर आपली चूक कबूल केली असून मॅच रेफरींनी दिलेला हा शिक्षावजा निर्णय अंतिम मानला गेला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, 2026 च्या सीझनमध्ये लिजेलने आतापर्यंत खेळलेल्या 5 मॅचमध्ये एकूण 213 रन ठोकले आहेत. यामध्ये तिच्या दोन शानदार हाफ सेंच्युरीचा समावेश असून ती सध्या दिल्लीच्या बॅटिंग लाईनअपचा मुख्य कणा मानली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
213 रन्स ठोकणाऱ्या दिल्लीच्या खेळाडूवर BCCI कडून कारवाईचा बडगा, Mumbai Indians विरूद्धच्या सामन्यात काय झालं होतं?