TRENDING:

रश्मी देसाई आजही योग्य जोडीदाराच्या शोधात, म्हणाली,"आता माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा"

Last Updated:
Rashmi Desai : रश्मी देसाईचं लग्न मोडलं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत ते रिलेशनमध्ये होती ते नातंही त्याचं तुटलं आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.
advertisement
1/7
रश्मी देसाई आजही योग्य जोडीदाराच्या शोधात, म्हणाली,"आता माझ्यासाठी माणूस..."
'उतरन' या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली तपस्या ठाकूर अर्थात अभिनेत्री रश्मी देसाई सध्या 'रश्मी दिल से दिल तक' या नव्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या माध्यमातून रश्मी देसाई प्रेक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सखोल माहिती देणार आहे.
advertisement
2/7
रश्मी देसाईची वैयक्तिक आयुष्यात अनेकदा फसवणूक झाली आहे. त्यामुळे प्रेम आणि लग्नाबाबत तिची मते आता वेगळी आहेत. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, जर ती कोणाशी भावनिकरित्या जोडली गेली तर ती आपले सर्वस्व त्या व्यक्तीला देऊ शकते. अभिनेता नंदीश संधूसोबतचे तुटलेले लग्न आणि अनेकांना डेट केल्यानंतरही रश्मी आजही योग्य जोडीदाराच्या शोधात आहे.
advertisement
3/7
आयएएनएसला दिलेल्या खास मुलाखतीत रश्मीने प्रेम, लग्न आणि नातेसंबंधांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, हे दोघे नेहमी हसतमुख दिसतात, पण त्यांनी आयुष्यात खूप काही सहन केले आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि त्यामुळेच ते परफेक्ट कपल आहेत, जे भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही पातळ्यांवर एकमेकांसोबत आहेत.
advertisement
4/7
रश्मी देसाई म्हणाली,"मी खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहे आणि मला समजून घेणे खूप कठीण आहे. जर मी कोणाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले, तर मी माझे हृदय, मालमत्ता, घर, पैसा सर्व काही देईन, कारण माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे".
advertisement
5/7
रश्मी म्हणाली,"पण इतक्या फसवणुका झाल्यानंतर आता मी कोणालाही माझ्या जवळ येऊ देत नाही. मात्र म्हणतात ना, देव काही ना काही मार्ग नक्की दाखवतो. या शोदरम्यान मला समजले की नातं हे दोन लोकांमध्ये असतं, सगळ्यांमध्ये नाही.”
advertisement
6/7
रश्मी देसाईने हेही सांगितले की काम आणि वैयक्तिक आयुष्य नेहमी वेगळे ठेवायला हवे. “आता मी माझ्या भावना कामामध्ये गुंतवल्या आहेत. मला काम करायला खूप आवडते. कामातून मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.
advertisement
7/7
‘उतरन’ या मालिकेत काम करत असतानाच रश्मीची भेट अभिनेता नंदीश संधूशी झाली होती. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रश्मीचे नाव अरहान खान आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेले. मात्र सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यावर रश्मीने कधीही उघडपणे बोलणे टाळले, तरी दोघांमधील मतभेद सर्वांनाच माहीत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मी देसाई आजही योग्य जोडीदाराच्या शोधात, म्हणाली,"आता माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा"
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल