Hemangi Kavi : 'उपवासापेक्षा मला...', एकादशीला मटण खाण्यावरून हेमांगी कवी ट्रोल, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actress Hemangi Kavi : हेमांगी कवी पुन्हा एकदा एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यात तिने एका चाहत्याला त्याच्या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
1/7

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि कोणत्याही विषयावर आपलं मत बेधडकपणे मांडते, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
advertisement
2/7
आता पुन्हा एकदा हेमांगी एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यात तिने एका चाहत्याला त्याच्या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
3/7
हेमांगी कवीने नुकतंच मुलाखती का द्यायच्या बंद केल्या, याबद्दल एक पोस्ट लिहिली होती. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ज्यामुळे एक नवा वाद सुरू झाला.
advertisement
4/7
चाहत्याने लिहिलं, “मॅडम, तुमच्या कोणत्याही निर्णयावर मला बोलायचं नाही, पण एकादशीच्या दिवशी आईने मटण केलं होतं म्हणून खाल्लं, ही पोस्ट आवडली नाही. तुम्ही नक्की खा, पण सोशल मीडियावर सांगून काय उपयोग?” चाहत्याच्या या कमेंटवर हेमांगीने त्याला जोरदार उत्तर दिलं.
advertisement
5/7
हेमांगीने चाहत्याला प्रत्युत्तर देताना लिहिलं, “एकादशीपेक्षा माझी आई आणि तिच्या भावना मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. माझ्यासाठी माझा देव, एकादशी, उपवास आणि शास्त्र वगैरे माझे जन्मदाते आहेत.”
advertisement
6/7
ती पुढे म्हणाली, “तुम्हाला माझं काही आवडलं नाही, तरी मला काहीही हरकत नाही.” हेमांगीच्या या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
advertisement
7/7
हेमांगी कवीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे आणि मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही ती सक्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hemangi Kavi : 'उपवासापेक्षा मला...', एकादशीला मटण खाण्यावरून हेमांगी कवी ट्रोल, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर