TRENDING:

Exclusive : रवी जाधवांचा 'फुलवरा' ठरला स्वप्नपूर्तीचा क्षण! 'द फोक आख्यान'च्या कलाकारांचा आनंद गगनात मावेना; पहिली प्रतिक्रिया

Last Updated:
The Folk Aakhyan - Phulwara : 'द फोक आख्यान' हा सांगितिक थाट रंगवणारे तरुण कलाकार आता थेट मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. रवी जाधव यांच्या फुलवरा सिनेमात वर्णी लागल्यानंतर न्यूज 18 मराठीशी बोलताना कलाकारांनी एक्सक्लुसिव्ह पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/10
फुलवरा : 'द फोक आख्यान'च्या कलाकारांचा आनंद गगनात मावेना, Exclusive प्रतिक्रिया
'थाट ह्यो जुना, खेळ हा नवा', म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आख्यानानं भुरळ घालणाऱ्या 'द फोक आख्यान' या सांगितिक थाटाची  सध्या सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्रातील तरुणाई आख्यानावर ठेका धरताना दिसतेय.
advertisement
2/10
'द फोक आख्यान' या कार्यक्रमानं त्यातील कलाकारांचं आयुष्यच बदललं. लाईव्ह शोच्या मंचावरुन आता त्यांचं काम थेट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/10
मातीतून उभे राहिलेले, सांगितिक थाट रंगवणारे हे तरुण कलाकार आता थेट मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. रवी जाधव दिग्दर्शित 'फुलवरा' या सिनेमात आख्यानाच्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
advertisement
4/10
'फुलवरा' सिनेमाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. तर सिनेमाची कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांची आहे. संगीत हर्ष-विजय यांचं आहे.
advertisement
5/10
'फुलवरा' मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. स्वतः रवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने हे कलाकार भावुक झालेत.  हा चित्रपट आमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे असं म्हणत त्यांनी पहिली एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया न्यूज 18 मराठीशी बोलताना दिली.
advertisement
6/10
फोक आख्यानचा निवेदक ईश्वर अंधारे यानं भावना व्यक्त करत सांगितलं, "तुम्हाला कुठेतरी या क्षेत्राचं वेड लागतं, तुम्ही एकांकिकांपासून प्रवास करता, त्यानंतर मोठी नाटके, मालिका वगैरे असा ज्याचा त्याचा प्रवास असतो."
advertisement
7/10
"अशा गोष्टी आपल्यासोबत घडाव्या असं स्वप्न असतं. जेव्हा त्या घडतात तेव्हा त्याचं कौतुक कमी होतं आणि ज्याने आपल्यासाठी ते घडवून आणलंय त्याचं कौतुक जास्त होतं."
advertisement
8/10
ईश्वर पुढे म्हणाला, "रवी जाधव यांच्या सारख्या माणसाला जेव्हा अस्सल मातीचं वेड लागून तो नवख्या पोरांवर विश्वास टाकतो, ही फार मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट घडतेय हे पचवण्यासाठीही वेळ लागतोय. जबाबदारी वाढली आहे."
advertisement
9/10
"पहिलं पोस्टर पाहून सगळ्यांचा सकारात्मक रिप्लाय आहेत. खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं आहे असे सगळ्यांचे रिप्लाय आहेत. चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. हे घडतंय, आपल्यासाठी दारं उघडली जात आहेत, आपल्यावर एवढा मोठा माणूस विश्वास ठेवतोय, हे आमच्यासाठी खूप मोठं आहे."
advertisement
10/10
"आम्ही तिघांनी (ईश्वर, हर्ष-विजय) रंगपंढरी नावाचा आमचा शो करताना ते आतपर्यंत जी स्वप्न पाहिली होती ती आज रवी सरांमुळे कुठेतरी पूर्ण होत आहेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Exclusive : रवी जाधवांचा 'फुलवरा' ठरला स्वप्नपूर्तीचा क्षण! 'द फोक आख्यान'च्या कलाकारांचा आनंद गगनात मावेना; पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल