TRENDING:

प्रथमेश कदमच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध Reel Star वर दु:खाचा डोंगर! शुभम जाधवच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनाची माहिती ताजी असताना एका प्रसिद्ध रील स्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नेमकं काय झालं?
advertisement
1/7
प्रथमेश कदमच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध Reel Star वर दु:खाचा डोंगर
काही दिवसांआधीच प्रसिद्ध मराठमोळा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं. प्रथमेशला रक्तातील सफेद कावीळ झाली होती. प्रथमेशच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता.
advertisement
2/7
प्रथमेशच्या निधनाची माहिती ताजी असताना आता आणखी एका प्रसिद्ध रील स्टारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध रील स्टार शुभम जाधवला पितृशोक झाला आहे.
advertisement
3/7
रील स्टार तसंच अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या शुभम जाधवच्या वडिलांचं निधन झालं. शुभमने सोशल मीडियावर पोस्ट लिहित वडिलांच्या निधनाची माहिती दिली.
advertisement
4/7
शुभमने वडिलांबरोबरचे आणि संपूर्ण फॅमिलीबरोबरचे फोटो शेअर केलेत. त्याबरोबर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. शुभमने लिहिलंय, भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा. खूप लवकर गेलात.
advertisement
5/7
शुभमच्या पोस्टवर अनेक कलाकार मित्रांनी देखील त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री श्रुती मराठी, प्रियदर्शनी इंदलकर, गौरी कुलकर्णी सारख्या अनेक कलाकारांनी शुभमला काळजी घे म्हणत आधार दिलाय.
advertisement
6/7
शुभम हा नुकताच बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर आलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणेचा खूप चांगला मित्र आहे. करण सोनावणे, शुभम आणि त्यांची गँग अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. करण सोनावणे बिग बॉसमध्ये गेल्यानंतर शुभमने बाहेरून त्याला खूप सपोर्ट केला होता.
advertisement
7/7
दरम्यान शुभम जाधवच्या वडिलांचं निधन नेमकं कशामुळे झालं याची माहिती समोर आलेली नाही. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये वडिलांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. त्याचे वडिल आजारी होते असा अंदाज त्याच्या फॅन्सने लावला आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रथमेश कदमच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध Reel Star वर दु:खाचा डोंगर! शुभम जाधवच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल