Bollywood Actress : शाहरुखची ऑनस्क्रीन आई, मराठी अभिनेत्यासोबत घटस्फोटानंतर शोधतेय नवं प्रेम, कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actress : आयुष्यात एखादं नातं तुटल्यानंतर अनेकजण पुन्हा प्रेमाच्या वाटेवर जायला घाबरतात. पण बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री पतीपासून वेगळं झाल्यानंतर ६ वर्षांनी पुन्हा प्रेमात पडायला तयार आहे.
advertisement
1/7

मुंबई: आयुष्यात एखादं नातं तुटल्यानंतर अनेकजण पुन्हा प्रेमाच्या वाटेवर जायला घाबरतात. पण टीव्ही आणि बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरली आहे.
advertisement
2/7
पतीपासून वेगळं झाल्यानंतर ६ वर्षांनी तिला पुन्हा प्रेमाची ओढ लागली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, 'जवान' चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारलेली अभिनेत्री रिद्धी डोगरा आहे.
advertisement
3/7
२०११ साली टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने अभिनेता राकेश बापटसोबत लग्न केलं होतं. 'मर्यादा-लेकिन कब तक' या मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली, मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
advertisement
4/7
त्यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडायची. पण दुर्दैवाने, लग्नाच्या ८ वर्षांनंतर २०१९ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
advertisement
5/7
नुकत्याच एका मुलाखतीत, रिद्धी डोगरा हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि प्रेमाबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं आहे. ती म्हणाली, "घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडायला मी का तयार नसेन? माझं हृदय नेहमीच प्रेमाचं स्वागत करतं. मी खूप रोमँटिक आहे. मला प्रेमात पडायला जास्त वेळ लागत नाही, पण मी खूप विचार करून व्यक्तींची निवड करते."
advertisement
6/7
रिद्धीने तिच्या चाहत्यांना एक खास सल्लाही दिला आहे. ती म्हणाली की, 'प्रेमात आपल्या आत्मसन्मान सोडू नका. कधीही स्वतःचा अपमान होऊ देऊ नका, कारण ते खरं प्रेम नाहीये.'
advertisement
7/7
रिद्धी डोगरा आणि राकेश बापट घटस्फोटानंतरही चांगले मित्र आहेत. 'बिग बॉस ओटीटी' आणि 'बिग बॉस १५' मध्ये तिने राकेशला खूप पाठिंबा दिला होता. ती म्हणते की, राकेशही आजही तिला खूप पाठिंबा देतो. आता रिद्धीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची नवी बहार येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actress : शाहरुखची ऑनस्क्रीन आई, मराठी अभिनेत्यासोबत घटस्फोटानंतर शोधतेय नवं प्रेम, कोण आहे ती?