Rinku Rajguru - Akash : रिंकू-आकाशचं कोर्ट मॅरेज, आर्ची - परशाचं वाजलं? त्या फोटोंनी चर्चांना उधाण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru -Akash Thosar : सैराट सिनेमा 9 वर्षांनी रि-रिलीज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रिंकू आणि आकाश यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केलंय असं दिसतंय. काय आहे या फोटोमागचं सीक्रेट?
advertisement
1/9

सैराट सिनेमाने आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू आणि आकाश हे दोन कलाकार मराठी इंडस्ट्रीला दिले. सैराटची ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार का असा प्रश्न अनेकांनी अनेकदा विचारला आहे.
advertisement
2/9
अशातच रिंकू आणि परशा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघांच्या हातात लग्नातील हार दिसत आहेत.
advertisement
3/9
इतकंच नाही तर दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील पाहण्यासारखा आहे. रिंकू आणि आकाशने खरंच लग्न केलं का? हा फोटो स्वतः आकाश ठोसर याने शेअर केला आहे.
advertisement
4/9
सैराट हा मराठी इंडस्ट्रीतला 100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा आहे. तब्बल 9 वर्षांनी हा सिनेमा रि-रिलीज करण्यात आला आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/9
याच निमित्ताने आकाश ठोसरने सैराट सिनेमातील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. दोघांचं लग्न झालेलं नसून सिनेमाच्या आठवणी त्याने शेअर केल्या आहेत.
advertisement
6/9
सिनेमात आर्ची आणि परशाचं कोर्ट मॅरेज दाखवण्यात आलं होतं. त्या सीन वेळचा हा फोटो आकाशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
7/9
आकाशने फोटो शेअर करत लिहिलंय, "सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच माझ्यासाठी स्वप्नागत होता, आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा ९ वर्षांचं प्रवास तुम्ही बघतच आलाय. आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय आणि याचा मला आज खरच खूप आनंद होत आहे."
advertisement
8/9
"परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून मला जगता येणारे, बघता येणारे. आणि हे शक्य झालं ते फक्त नागराज आण्णांमुळे! सैराटमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल मी आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद !"
advertisement
9/9
"तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका", असं आवाहनही आकाशने प्रेक्षकांना केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru - Akash : रिंकू-आकाशचं कोर्ट मॅरेज, आर्ची - परशाचं वाजलं? त्या फोटोंनी चर्चांना उधाण