Rinku Rajguru : 24 वर्षांची 'आर्ची' झाली वारकरी, मराठमोळ्या शृंगाराने जिंकली मन, रिंकू राजगुरुचे खास PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rinku Rajguru : 'सैराट' चित्रपटातील 'आर्ची' या डॅशिंग भूमिकेने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या अत्यंत साध्या आणि भक्तिमय अवतारामुळे.
advertisement
1/7

'सैराट' चित्रपटातील 'आर्ची' या डॅशिंग भूमिकेने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या अत्यंत साध्या आणि भक्तिमय अवतारामुळे.
advertisement
2/7
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात रिंकूने यंदा आपल्या वडिलांसोबत सहभाग घेतला. हातात टाळ, कपाळी गंध, पारंपरिक नऊवारी साडी आणि डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन रिंकूने वारीत सहभाग घेतला.
advertisement
3/7
रिंकू चक्क एका वारकऱ्याच्या रूपात विठूमाऊलीच्या भेटीला निघालेली पाहून तिचे चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत. तिचा पारंपारिक अवतार पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं.
advertisement
4/7
रिंकूने वारीतील आपला अनुभव आणि भावना व्यक्त करणारा एक खास व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रिंकूने लिहिले आहे, "जय जय राम कृष्ण हरी! मी वयाच्या 4 थ्या वर्षी माझ्या बाबांसोबत वारीत गेले होते. आज तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तेच क्षण जगतेय... हे क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत."
advertisement
5/7
वडिलांसोबत पुन्हा त्याच श्रद्धेने वारीचा अनुभव घेणे, ही तिच्यासाठी केवळ एक धार्मिक यात्रा नसून, भावनिक आणि आत्मिक समाधान देणारा क्षण ठरला.
advertisement
6/7
ती वडिलांसोबत फुगडी खेळताना आणि इतर महिला वारकऱ्यांमध्ये मिसळून पारंपरिक खेळांमध्ये सहभागी होताना दिसली. तिच्या आनंदात भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत होती.
advertisement
7/7
दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भेटीसाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पायपीट करत पंढरपूरकडे जातात. भजन, किर्तनात दंग होऊन, हरीनामाचा जप करत वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वाटचाल करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 24 वर्षांची 'आर्ची' झाली वारकरी, मराठमोळ्या शृंगाराने जिंकली मन, रिंकू राजगुरुचे खास PHOTO