TRENDING:

Rinku Rajguru: 'माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेटवर' रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती कोण?

Last Updated:
Rinku Rajguru: रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी खास पोस्ट करत असते. पण यावेळी तिने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
1/7
'माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेटवर' रिंकूच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती कोण?
‘सैराट’ मधून घराघरात पोहोचलेली आणि लोकांच्या मनात कायमची घर करणारी रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी खास पोस्ट करत असते. पण यावेळी तिने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
2/7
रिंकूने नुकतेच तिच्या ‘डिनर डेट’चे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. रिंकूच्या पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या ही रिंकू नेमकी कोणासोबत डिनर डेटला गेली आहे.
advertisement
3/7
रिंकूने मस्त जेवणाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिल, "माझा पर्मनंटसोबत डिनर डेट" चाहत्यांनी लगेच अंदाज लावायला सुरुवात केली. काहींनी तर सरळ आकाश ठोसरचं नाव घ्यायलाही उशीर केला नाही.
advertisement
4/7
रिंकूने पुढच्याच पोस्टमध्ये तिच्या पर्मनंट डेट पार्टनर कोण आहे चेहरा उघड केला. त्यामुळे तिनं चाहत्यांना पहिल्या फोटोने चकवलं आणि लगेच पुढच्या फोटोंमध्ये सांगून टाकलं.
advertisement
5/7
रिंकूने शेवटी तिच्या ‘पर्मनंट’ व्यक्तीचं नाव उघड केलं आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई होती. "माझी पर्मनंट… आई आणि मी," असं लिहून तिने आईसोबतचा गोड फोटो शेअर केला.
advertisement
6/7
त्या फोटोसोबत उकडीचे मोदक, गरमागरम जेवणाचं ताट आणि रिंकूचा मनमोकळा हसरा चेहरा… सगळं पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले. नेटिझन्सनी कमेंट्समध्ये भरभरून प्रेम दाखवलं.
advertisement
7/7
"तुझी आई तर अगदी तुझ्यासारखीच गोड आहे", "आईसोबतची डेट म्हणजे जगातली सगळ्यात स्पेशल डेट" अशा प्रतिक्रिया आल्या. रिंकूच्या या साध्याशा पण गोड पोस्टने हे सिद्ध केलं – स्टार असो वा सामान्य माणूस, आईसारखी माणसं आपल्या आयुष्यात ‘पर्मनंट’ असायलाच हवीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru: 'माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेटवर' रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल