Rinku Rajguru : 'बाईच छान, बाईच मस्त…' पुरुषांविषयी का बोललं जात नाही? रिंकू राजगुरूचा थेट सवाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनं आशा सिनेमाच्या निमित्तानं अनेक मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत बोलताना तिनं समाज पुरुषांबाबत फार कमी का बोलतो, असं स्पष्ट मत व्यक्त केलं.
advertisement
1/9

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आशा हा सिनेमा येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. या सिनेमाच्या निमित्तानं एक वेगळी रिंकू राजगुरू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/9
आशा सेविकांचं काम आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात रिंकू राजगुरू स्वत: आशा सेविकेच्या भूमिकेत आहे. आर्चीनंतर रिंकूच्या आशा सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
advertisement
3/9
"बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशी टॅगलाइन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्तानं रिंकूनं अनेक मुलाखती दिल्या आहेत. एका मुलाखतीत बोलताना तिनं स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेदभावाविषयी भाष्य केलं.
advertisement
4/9
यशस्वी बाईच्या पाठीमागे खरंतर एक खंबीर पुरुष असतो, पण समाज पुरुषांबाबत फार कमी का बोलतो, असं स्पष्ट मत रिंकूनं व्यक्त केलं आहे.
advertisement
5/9
बोलभिडूशी बोलताना रिंकू म्हणाली, "आधीच्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या पण आता गोष्टी खूपच बदलल्या आहेत. जशी बाईची बाजू असते तसं पुरुषाचंही काही तरी असणारच आहे पण त्याविषयी कधी बोललं जात नाही."
advertisement
6/9
"मला आशाचं प्रमोशन करताना बऱ्याचदा असं वाटतं की, बाईच किती छान, बाईच किती मस्त. त्यांच्यामागे पुरूषही तितके सपोर्टिव्ह असले तर आजकालच्या बायका बाहेर येऊ शकतात आणि तितकं काम करू शकतात. पण त्यांच्याविषयी कित्येकदा आपण खूप कमी बोलतो."
advertisement
7/9
रिंकूचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. रिंकू राजगुरूची विचार करण्याची पद्धत, तिचा अभ्यास, तिला आलेली समज हे सगळं यावेळी पाहायला मिळालं.
advertisement
8/9
रिंकू राजगुरूसाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांनी रिंकू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आशा या सिनेमासाठी रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. अनेक फेस्टिव्हल्समध्ये आशा या सिनेमानं नाव कमावलं आहे.
advertisement
9/9
'सैराट'ची आर्ची ते आता 'आशा'मधील मालती या रिंकू राजगुरूच्या करिअरमधील इमेज चेंजिंग पॉइंट ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमाला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे 19 डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'बाईच छान, बाईच मस्त…' पुरुषांविषयी का बोललं जात नाही? रिंकू राजगुरूचा थेट सवाल