सैराटमधील तो Kissing सीन, ऐकूनच घाबरली होती रिंकू; मग कसा केला Shoot? सांगितली पडद्यामागची Untold Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सैराट सिनेमातील क्लायमॅक्सचा तो किसींग शूट कसा शूट केला यामागची अनटोल्ड स्टोरी पहिल्यांदाच रिंकूने सांगितलं. पहिल्यांदा सीन ऐकल्यानंतर रिंकू चांगलीच घाबरली होती. मग हा सीन कसा शूट करण्यात आला?
advertisement
1/9

मराठी सिनेसृष्टीत 100 कोटींहून अधिक कमाई करणारा सिनेमा म्हणजे सैराट. आज या सिनेमाला जवळपास 10 वर्ष होऊन गेली आहेत. तरीही या सिनेमाची प्रेक्षकांच्या मनात असलेली क्रेझ कायम आहे. आजही सैराट सिनेमा म्हटला की लोक आवडीनं पाहतात. सैराटमध्ये आर्ची आणि परशाची जोडी आजही तितकीच लोकप्रिय आहे.
advertisement
2/9
आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर ही जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्तानं पडद्यावर झळकली. या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागलं. बॉलिवूडनं देखील या सिनेमाची दखल घेतली आणि धडक नावानं सिनेमाचं हिंदी वर्जन आणलं.
advertisement
3/9
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातील झिंगाट हे गाणं प्रचंड हिट झालं. सैराटमधील हे गाणं, क्लायमॅक्स आणि तो किसींग सीन आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. याचवेळी सिनेमाची संपूर्ण स्टोरी बदलले आणि खरा सैराट सुरू होतो.
advertisement
4/9
सिनेमातील आर्ची आणि परशाचा हा सीन कसा शूट झाला याबद्दल अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच बोलली. आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलतानं रिंकून त्या सीनच्या मागची स्टोरी सांगितली.
advertisement
5/9
हा सीन शूट केला तेव्हा रिंकू फक्त सातवीत होती. तिला काय घडतंय, स्क्रिनवर काय दिसणार आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण नागराज मंजुळे यांनी तो किसिंग सीन रिंकू आणि आकाश यांच्याकडून करून घेतला होता.
advertisement
6/9
रिंकू म्हणाली, "मी सीन ऐकला होता तेव्हा मी घाबरलेले. पण तेव्हा मला नागराज दादा म्हणालेले, अगं दिसतं तसं करताना नसतं. तो सीन करताना आम्ही हसत होतो."
advertisement
7/9
रिंकू पुढे म्हणाली, "मला आता कळतंय की ती कॅमेरा मुमेन्ट होती. खरंत आम्ही फाल्तू गप्पा मारून हसत होतो त्या सीनला. दिसत वेगळं होतं त्यामुळे अजिबात भीती नाही वाटली."
advertisement
8/9
"आम्ही सगळी मुलं चार महिने एकत्र राहिलो होतो. त्यामुळे कम्फर्ट येतो", असंही रिंकूनं सांगितलं. सैराटच्या आधी सगळ्या कलाकारांचं एकत्र वर्कशॉप झालं होतं.
advertisement
9/9
2016 साली सैराट हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाची स्टोरीच नाही तर सिनेमातील गाणीही हिट झाली. सिनेमानं 110 कोटींची कमाई केली. मागच्या 10 वर्षात सैराट सिनेमाचा रेकॉर्ड कोणताच मराठी सिनेमा मोडू शकलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सैराटमधील तो Kissing सीन, ऐकूनच घाबरली होती रिंकू; मग कसा केला Shoot? सांगितली पडद्यामागची Untold Story