Best Romantic Thriller Film On OTT: लग्न, धोका आणि षडयंत्र! इंटीमेट सीन्सने भरलेली सस्पेन्स थ्रिलर, शेवट पाहून डोकं भणभणेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Romantic Thriller Film On OTT: थांबा... हा चित्रपट सुरू करताना एक गोष्ट नक्की करा, तुमच्या रूमचा दरवाजा नीट बंद करा! कारण हा अनुभव तुम्हाला पूर्णपणे गुंतवून टाकणारा आहे.
advertisement
1/8

एखादी फिल्म पहायची असेल आणि तुम्हाला रोमँस, थ्रिल आणि धक्कादायक ट्विस्ट यांचा परिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल, तर एकच नाव सध्या चाहत्यांच्या ओठावर आहे, ते म्हणजे ‘चतुरम’. पण थांबा... हा चित्रपट सुरू करताना एक गोष्ट नक्की करा, तुमच्या रूमचा दरवाजा नीट बंद करा! कारण हा अनुभव तुम्हाला पूर्णपणे गुंतवून टाकणारा आहे.
advertisement
2/8
OTT प्लॅटफॉर्मवर विविध भाषांमधील आणि छोट्या बजेटमधील अनेक दर्जेदार फिल्म्स रसिकांच्या मनात घर करत आहेत. याच मालिकेत, 2022 मध्ये प्रदर्शित झालेली मलयाळम फिल्म 'चतुरम' आता सायना प्ले या ओटीटीवर उपलब्ध आहे आणि तिचा तेलुगू डबही तितकाच प्रभावी आहे.
advertisement
3/8
दिग्दर्शक सिद्धार्थ भारतन यांनी साकारलेली ही फिल्म तुम्हाला एका साध्या, शांत सुरुवातीपासून एका अशक्य आणि उधळलेल्या प्रेमाच्या प्रवासात घेऊन जाते. प्रमुख भूमिकांमध्ये स्वासिका, रोशन मैथ्यू, आणि अलेंसियर ले लोपेज यांची अभिनयाची ताकदपूर्ण झलक अनुभवायला मिळते.
advertisement
4/8
कथा थोडक्यात सांगायची तर... एक यशस्वी उद्योजक एल्डहोज, आपल्या पहिल्या पत्नीने सोडून गेल्यानंतर सेलिना या तरुणीशी लग्न करतो. काही काळ सगळं आलबेल सुरू असतं, पण लवकरच नातं बिघडतं आणि तिचं आयुष्य त्रासदायक होतं.
advertisement
5/8
एक अपघात एल्डहोजला अंथरुणावर आणून ठेवतो आणि तेव्हाच त्यांच्या घरात एक <span class="corrected">नवा</span> चेहरा दाखल होतो, तो म्हणजे केअरटेकर बाल्थाजार. आणि इथेच कथा एक जबरदस्त वळण घेते.
advertisement
6/8
सेलिना आणि बाल्थाजारचं जवळ येणं, त्यांचं प्रेम, आणि त्यामागे दडलेली एक स्फोटक योजना. ही गोष्ट फक्त प्रेमकथा नसून बदला, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास यांचं मिश्रण आहे. विशेष म्हणजे ही कथा खऱ्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित आहे.
advertisement
7/8
‘चतुरम’ हा चित्रपट <span class="corrected">इंटिमेट</span> सीनमुळे आणि थरारक <span class="corrected">ट्विस्टमुळे</span> चर्चेत राहिला. पण त्याचवेळी, त्याची पटकथा, पार्श्वसंगीत आणि अभिनय हे सर्व काही इतकं प्रभावी आहे की तुम्ही शेवटपर्यंत खिळून राहता.
advertisement
8/8
जर तुम्ही काहीतरी हटके आणि धाडसी बघायच्या मूडमध्ये असाल, तर ‘चतुरम’ तुमच्या वॉच लिस्टमध्ये जरूर असली पाहिजे. पण लक्षात ठेवा, ही कथा पाहताना दरवाजा बंद करा… आणि मनाची तयारी ठेवा. कारण एकदा ही फिल्म सुरू केली, तर थांबणं शक्यच नाही!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Best Romantic Thriller Film On OTT: लग्न, धोका आणि षडयंत्र! इंटीमेट सीन्सने भरलेली सस्पेन्स थ्रिलर, शेवट पाहून डोकं भणभणेल