पाकिस्तानमध्ये सैफ अली खानचे नातेवाईक, क्रिकेटशी आहे कनेक्शन; कोण आहेत ते?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Saif Ali Khan Relatives in Pakistan : अभिनेता सैफ अली खानचं कनेक्शन फक्त बॉलिवूड आणि क्रिकेटशी नाही तर पाकिस्तानशी आहे. सैफचे नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतात. कोण आहेत ते?
advertisement
1/10

अभिनेता सैफ अली खान हा पतौडी नवाब आहे. मुंबईच नाही तर देशात त्याची संपत्ती आहे. सैफचे वडिल भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मंसूर आली खान पतौडी.
advertisement
2/10
तुम्हाला माहिती आहे का सैफ अली खानचा संबंध केवळ फिल्म इंडस्ट्री आणि पतौडी घरापुरता मर्यादित नाही. सैफच्या कुटुंबाची नाळ पाकिस्तानशी आहे. पाकिस्तानमध्येही सैफ अली खानचे काही नातेवाईक राहतात. पाकिस्तानमध्ये असलेले सैफचे ते नातेवाईक आहेत तरी कोण?
advertisement
3/10
पाकिस्तानमध्ये पाहत असलेल्या सैफ अली खानच्या नातेवाईकांचा संबंध पाकिस्तानची कूटनीती आणि क्रिकेटशीसुद्धा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे माजी चेअरमन आणि अनुभवी राजनयिक शहरयार खान हे सैफ अली खानचे नातेवाईक होते. ते सैफचे काका लागतात. त्यामुळे सैफ अली खानच्या कुटुंबाचा इतिहास भारत-पाकिस्तानच्या राजघराण्यांशी आणि क्रिकेटशी जोडलेला असल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
4/10
शहरयार खान हे कोण होते पाहूयात. शहरयार खान यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातील एका शाही कुटुंबात झाला होता. कुरवाईचे नवाब मुहम्मद सरवर अली खान आणि बेगम आबिदा सुल्तान हे त्यांचे आई-वडिल आहे.
advertisement
5/10
आबिदा सुल्तान या भोपालच्या शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांची मोठी मुलगी. त्यामुळे शहरयार खान यांचा थेट संबंध भोपाळच्या शाही घराण्याशी होता.
advertisement
6/10
भोपाळच्या शाही घराण्याचा संबंध पतौडी घराण्याशी कसा जोडला गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं झालं असं की, आबिदा सुल्तान यांची धाकट्या बहिण साजिदा सुल्तान यांनी इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं.
advertisement
7/10
साजिदा सुल्तान म्हणजेच सैफचे वडिल मंसूर अली खान पतौडी यांची आई. त्यामुळे शहरयार खान आणि मंसूर अली खान पटौदी हे फर्स्ट कझिन झाले. त्यामुळे शहरयार खान हे सैफ अली खानचे काका झाले.
advertisement
8/10
शहरयार खान यांनी पाकिस्तानचे करिअर डिप्लोमॅट म्हणून मोठी ओळख निर्माण केली. त्यांनी 1990 ते 1994 या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केलं. राजकीय कारकिर्दीत त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र धोरणाच्या संवेदनशील काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली.
advertisement
9/10
शहरयार खान दोन वेळा पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन होते. 2003 ते 2006 या काळात अनेक वर्षांच्या खंडानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले.
advertisement
10/10
2014 ते 2017 दरम्यान 2009 च्या लाहोर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून जवळपास वेगळा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर PCB ची विश्वासार्हता आणि स्थिरता परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या निर्णयांवर कधी कौतुक तर कधी टीका झाली पण संक्रमणाच्या काळात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाकिस्तानमध्ये सैफ अली खानचे नातेवाईक, क्रिकेटशी आहे कनेक्शन; कोण आहेत ते?