Sakhi Gokhale : उफ्फ तेरी अदा! 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखलेच्या फिटनेसचं गुपित काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sakhi Gokhale Fitness : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखले 'वरवरचे वधू-वर' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या सईचं आपल्या फिटनेसकडेही तेवढंच लक्ष आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवगंत अभिनेते मोहन गोखले यांची गुणी लेक अर्थात सखी गोखले 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे.
advertisement
2/7
'दिल दोस्ती दुनियादारी', 'अमर फोटो स्टुडिओ' अशा वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या तिच्या 'वरवरचे वधू-वर' या नाटकाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.
advertisement
3/7
नाटकाचा प्रयोग आणि चित्रीकरणादरम्यान सई आपल्या फिटनेस आणि डाएटकडेही तेवढंच लक्ष देते.
advertisement
4/7
अभिनयक्षेत्रात कार्यरत असलेल्या सईला आपली देहबोली उत्तम हवी, याचा अंदाज आहे. त्यामुळे फिटनेसकडे ती कायम फोकस करते.
advertisement
5/7
सई नियमित व्यायाम करते. एखाद्या पात्राच्या आवश्यकतेनुसार ती आपल्या वर्कआऊट प्लॅनमध्ये बदल करते.
advertisement
6/7
सई अनेकदा तिचा पती अभिनेता सुव्रत जोशीसोबत वर्कआऊट करते. वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करत असते.
advertisement
7/7
सई संध्याकाळी 7 नंतर जेवण करत नाही. एकाचवेळी खूप जास्त प्रमाणात खाण्यापेक्षा दर दोन तासांनी थोडं-थोडं खाण्यावर ती भर देते. सईच्या फिट राहण्याच्या टिप्सचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यातही आवश्य करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sakhi Gokhale : उफ्फ तेरी अदा! 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखलेच्या फिटनेसचं गुपित काय?