TRENDING:

2,900 कोटींच्या संपत्तीचा मालक, मागच्या 25 वर्षात हॉटेलमध्ये जेवला नाहीये सलमान खान, पण का?

Last Updated:
Why Salman Khan Not Gone Out For Dinner In Past 25 Years: सलमान खान अनेकदा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतो आणि तिथे स्वत:बद्दल असं काही सांगतो की सगळेच शॉक होतात. अलिकडेच तो रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाला. जिथे त्याने स्वतःबद्दल असं काही सांगितलं की फॅन्स ऐकतच बसले. सलमान खान मागच्या 25 वर्षात बाहेर कुठेच जेवला नाहीये, असं त्याने सांगितलं.  
advertisement
1/8
2,900 कोटींच्या संपत्तीचा मालक, पण 25 वर्षात हॉटेलमध्ये जेवला नाहीये सलमान खान
सलमान खान अनेकदा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतो आणि तिथे स्वत:बद्दल असं काही सांगतो की सगळेच शॉक होतात. अलिकडेच तो रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाला. जिथे त्याने स्वतःबद्दल असं काही सांगितलं की फॅन्स ऐकतच बसले. सलमान खान मागच्या 25 वर्षात बाहेर कुठेच जेवला नाहीये, असं त्याने सांगितलं.
advertisement
2/8
सलमान खान 27डिसेंबर रोजी 60 वर्षांचा होत आहे. 90 च्या दशकापासून चित्रपटांमध्ये सक्रिय असलेला सलमान 35 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. त्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक गाणी तयार केली आहेत आणि गाणी गायली आहेत. तो त्याच्या फिटनेसबाबत खूप सजग असतो.
advertisement
3/8
सौदी अरेबियातील जेद्दाह येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सलमान खानने 'इन कॉन्व्हर्सेशन विथ' सेशनला हजेरी लावली होती. तेव्हा त्याने त्याचं करिअर आणि लाईफस्टाइल यावर भाष्य केलं.
advertisement
4/8
सलमान म्हणाला, "मी बाहेर जेवायला गेलेल्याला 25-26 झाली आहे. शूटिंगपासून ते घरापर्यंत, घरापासून ते शूटिंगपर्यंत, घरापासून ते एअरपोर्टपर्यंत, एअरपोर्टपासून ते हॉटेलपर्यंत आणि हॉटेलपासून ते कार्यक्रमांपर्यंत... हेच माझे आयुष्य आहे."
advertisement
5/8
तो पुढे म्हणाला, "मला यात कोणतीही अडचण नाही. मला फिरायचे नाही आणि हे सर्व (स्टारडम) नको आहे. लोक मला खूप प्रेम आणि आदर देतात आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम करतो. कधीकधी मी थोडासा आत्मसंतुष्ट होतो. पण मला ते आवडते आणि पुढे काय होते ते पाहतो."
advertisement
6/8
जवळच्या मित्रांना गमावणं सलमानचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्याविषयी तो म्हणाला, "माझे आयुष्य बहुतेक कुटुंब आणि मित्रांभोवती गेले आहे. त्यापैकी बरेच जण आता माझ्यासोबत नाहीत. आता फक्त 4-5 जण उरले आहेत जे माझ्यासोबत बराच काळ राहिले आहेत."
advertisement
7/8
सलमान खान शेवटचा 'सिकंदर' चित्रपटात दिसला होता, ज्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या वेब शो "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" मध्येही एक छोटीशी भूमिका साकारली होती. नुकताच त्याचा बिग बॉस 19 हा शो संपला.
advertisement
8/8
'बॅटल ऑफ गलवान' हा सलमानचा पुढील चित्रपट आहे. ज्यामध्ये तो चित्रांगदा सिंगसोबत दिसणार आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या ऐतिहासिक संघर्ष दाखवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2,900 कोटींच्या संपत्तीचा मालक, मागच्या 25 वर्षात हॉटेलमध्ये जेवला नाहीये सलमान खान, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल