Sankarshan Karhade : रात्री अचानक पोलिसांनी थांबवली गाडी, घाबरला संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्याने असं काय केलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कार पोलिसांनी भर रस्त्यात थांबवली. अभिनेत्याने असं केलं काय?
advertisement
1/7

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने आणि लेखनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आधी टेलिव्हिजन आणि मराठी रंगभूमीवर संकर्षण कऱ्हाडे त्याची नवीन ओळख निर्माण करतोय.
advertisement
2/7
संकर्षणच्या नाटकाचे दौरे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर विदेशातही त्याचं नाटक हाऊसफुल होत आहे. कामानिमित्तानं कलाकार मंडळी कधी भल्या पहाटे, कधी मध्यरात्री बाहेर फिरत असतात. त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा फिक्स नसताता. संकर्षणच्या बाबतीतही तसंच आहे.
advertisement
3/7
संकर्षण कऱ्हाडे नुकताच रात्री घरी जात असताना पोलिसांनी रस्त्यात त्याची गाडी थांबवली. संकर्षणने काहीही चूक केलेली नसताना त्यांनी त्याला गाडी थांबवायला सांगितली. संकर्षणला थोडा वेळ काही कळलं नाही. तो घाबरून गेला.
advertisement
4/7
मात्र पोलिसांनी गाडी थांबवण्यामागचं कारण सांगितलं तेव्हा संकर्षणही शॉक झाला. रात्री नेमकं काय घडलं हे संकर्षणने फोटो आणि पोस्ट शेअर करत सांगितलं.
advertisement
5/7
संकर्षणची गाडी रात्री पोलिसांनी रस्त्यात थांबवली. संकर्षणने कोणतीही चूक केली नव्हती. पण पोलीसही संकर्षणचे चाहते निघाले. त्यांनी संकर्षणबरोबर फोटो काढण्यासाठी त्याची गाडी थांबवली. संकर्षणने पोलिसांसोबतचे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/7
संकर्षणने पोस्टमध्ये लिहिलंय, "रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते. काहीही केलं नसतांना ऊगीच मनांत भिती वाटते आणि पोलrस मामा येऊन म्हणतात "साहेब एक फोटो काढू…" आणि मग खूप गप्पा. खरं सांगू… मला "वर्दीतल्या सेलिब्रिटिंसोबत" फोटो काढायला फार आवडतं."
advertisement
7/7
संकर्षणची ही पोस्ट चाहत्यांचा पसंतीस उतरली आहे. गेल्या काही वर्षात त्याने केलेल्या कामाची त्याला मिळालेली ही पोचपावती आहे. संकर्षण देखील या प्रसंगानंतर खूप खुश झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sankarshan Karhade : रात्री अचानक पोलिसांनी थांबवली गाडी, घाबरला संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्याने असं काय केलं?