गणित आणि विज्ञानात 'ढं', दहावीत 2 वेळा नापास झाली 'ही' टॉपची मराठमोळी अभिनेत्री!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकताच एक असा धक्कादायक खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ती म्हणाली की, दहावीत ती दोन वेळा नापास झाली होती!
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत, जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण, त्यांच्या पडद्यामागील आयुष्यात किती संघर्ष असतो, हे क्वचितच आपल्याला माहीत असतं. अशीच एक अभिनेत्री, जिने नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने पडदा गाजवला. 'मृत्युदंड', 'बेवफा सनम' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
2/8
लग्नानंतर अनेक वर्षं ती चित्रपटांपासून दूर होती, पण नुकतीच ती 'बिग बॉस १८' मध्ये दिसली आणि तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, या प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकताच एक असा धक्कादायक खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ती म्हणाली की, दहावीत ती दोन वेळा नापास झाली होती!
advertisement
3/8
ही अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर. शिल्पाने काही दिवसांपूर्वी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या शिक्षणाबद्दल एक अत्यंत प्रांजळ आणि हृदयस्पर्शी खुलासा केला. ती म्हणाली, "पाली हिलमध्ये माझं शिक्षण झालं. मी कॉलेजला गेले नाही, कारण माझं करिअर लवकर सुरू झालं."
advertisement
4/8
तिने पुढे जे सांगितलं, ते ऐकून अनेकांना धक्का बसेल. "जेव्हा मी दहावीची परीक्षा दिली, तेव्हा मी नापास झाले. विज्ञान व गणित विषयात मी नापास झाले होते." नापास झाल्यावरही तिने हार मानली नाही. "त्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली, त्यावेळीसुद्धा मी काम करत होते. मी ती त्या परीक्षादेखील पास होऊ शकले नाही. त्या परीक्षेत मी विज्ञान विषयात पास झाले. पण, मी गणितात नापास झाले," असं ती म्हणाली. दोनदा अपयश आल्यावरही तिने प्रयत्न सोडले नाहीत, हे तिच्या जिद्दीचं प्रतीक आहे.
advertisement
5/8
पण, तिसऱ्यांदा परीक्षेला बसण्याऐवजी तिने वेगळा मार्ग निवडला. "माझी आई मला नेहमी म्हणायची, तू तिसऱ्यांदा परीक्षा दिलीस ना, तर तू नक्की पास होशील. पण, मी तिला सांगितलं की आता मी परीक्षा देणार नाही. आता मी काम करते, तर मी दोन्ही गोष्टी करू शकत नाही." तिने अभ्यासाऐवजी कामाला प्राधान्य दिलं.
advertisement
6/8
शिल्पा शिरोडकर पुढे म्हणाली, "त्यानंतर मी अभ्यास सोडला. पण, देवाच्या कृपेने या इंडस्ट्रीने मला एवढं दिलं की असं वाटलं नाही की शिक्षण पूर्ण करायला हवं होतं. मला वाटतं की मी असं करिअर निवडलं, ज्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्याची गरज नव्हती." तिच्या या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, शिक्षण अपूर्ण राहिलं तरी, योग्य क्षेत्र निवडल्यास आणि कठोर परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळतं. तिने आपल्या यशाचं श्रेय नशिबाला आणि मिळालेल्या संधींना दिलं.
advertisement
7/8
शिल्पा शिरोडकरने १९८९ मध्ये 'भ्रष्टाचार' या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात रेखा आणि मिथुन चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर तिने 'त्रिनेत्रा', 'किशन कन्हैय्या', 'हम' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं, जे बॉक्स ऑफिसवर खूप गाजले.
advertisement
8/8
'बिग बॉस १८' मध्ये तिच्या खेळाचं खूप कौतुक झालं होतं आणि ती अगदी शेवटच्या टप्प्यात बाहेर पडली होती. आता आगामी काळात शिल्पा शिरोडकर कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गणित आणि विज्ञानात 'ढं', दहावीत 2 वेळा नापास झाली 'ही' टॉपची मराठमोळी अभिनेत्री!