Aarya Aambekar : 'वयाच्या 6 व्या वर्षीच...', 'या' एका घटनेने आर्या आंबेकरचं पूर्ण आयुष्यच बदललं!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aarya Aambekar Birthday : आज संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलेल्या आर्याला कधीकाळी गायिका बनायचेच नव्हते? तिच्या मनात वेगळेच स्वप्न दडलेले होते.
advertisement
1/8

गोड गळ्याची, लाघवी हास्याची आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी गायिका आर्या आंबेकर, सध्या सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक अपडेटसाठी उत्सुक असतात.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहीत आहे का, आज संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलेल्या आर्याला कधीकाळी गायिका बनायचेच नव्हते? होय, हे सत्य आहे! तिच्या मनात वेगळेच स्वप्न दडलेले होते, जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल.
advertisement
3/8
राजश्री मराठीच्या एका खास मुलाखतीत आर्या आंबेकर हिने तिच्या करिअरबद्दल एक महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी खुलासा केला. आर्याने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "मी लहान असताना माझ्या आजीने मला अनेक गाणी शिकवली होती.
advertisement
4/8
लहान असल्यापासून मी आईकडे गाणे शिकायचे. सहाव्या वर्षी मी गाण्याची पहिली परीक्षा दिली. त्यानंतर मी शाळेतूनही विविध गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. असे असूनही मी कधीच गाण्याचा करिअर म्हणून विचार केला नव्हता." पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते.
advertisement
5/8
आर्या म्हणाली, "मला कायमच डॉक्टर बनायचे होते." हे ऐकून अनेकांना धक्का बसला, कारण तिचा आवाज आणि संगीतावरील प्रेम पाहून ती डॉक्टरी करू शकते, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. "मला डॉक्टर व्हायचे होते. पण 'सारेगमप'चे आभार, की त्यांनी मला संगीतक्षेत्रातील संधी दाखवली. त्यानंतरच माझा निर्णय बदलला," असे तिने पुढे सांगितले.
advertisement
6/8
आर्या फक्त गायिकाच नाही, तर ती अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. तिने फर्ग्युसन कॉलेजमधून 'बी.ए.' केले असून त्यावेळी तिने अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर तिने संगीत विषयात 'एम.ए.' केले.
advertisement
7/8
विशेष म्हणजे, ती 'एम.ए.' मध्ये संपूर्ण युनिव्हर्सिटीमधून पहिली आली होती आणि तिला गोल्ड मेडल मिळाले होते! एवढेच नाही, तर तिने साऊंड इंजिनिअरिंगचा सर्टिफिकेट कोर्सही पूर्ण केला आहे.
advertisement
8/8
आर्याने आजवर मराठी भाषेत अनेक गाणी गायली असून तिची काही गाणी सुपरहिट झाली आहेत. 'जरा जरा', 'केवड्याचं पान तू', 'बाई गं' ही तिची गाणी खूप गाजली होती. याशिवाय तिने 'ती सध्या काय करते' या सिनेमात अभिनयही केला होता. अभिनय बेर्डेबरोबर तिने या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती, जिथे तिला प्रेक्षकांनी अभिनेत्री म्हणूनही पसंत केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aarya Aambekar : 'वयाच्या 6 व्या वर्षीच...', 'या' एका घटनेने आर्या आंबेकरचं पूर्ण आयुष्यच बदललं!