त्याला पण बोलू द्या..! स्मृतीच्या लग्नात होता अभिनेता, घेतली पलाशची बाजू; सांगितलं सांगलीत नेमकं काय घडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smriti Mandhana - Palach Muchchal : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न फसवणूक आणि वादामुळे मोडलं. प्रसिद्ध अभिनेत्यानं त्यांच्या लग्नात नेमकं काय घडलं हे सांगितलं.
advertisement
1/7

क्रिकेटर स्मृती मानधना आणि गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न मोडून जवळपास तीन महिने होत आले आहेत. तरीही त्यांच्या लग्नासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे होतच आहेत. पलाश मुच्छल काही दिवसांआधी फसवणूकीच्या आरोपांमुळे गोत्यात आला होता.
advertisement
2/7
दरम्यान स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाला गेलेल्या एका अभिनेत्यानं तिथे नेमकं काय घडलं हे सांगितलं. हे सांगत असताना त्याने पलाशची बाजू देखील घेतली आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला?
advertisement
3/7
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या लग्नात अभिनेता नंदीश संधू याने देखील हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नात नेमकं काय घडलं हे त्याने सांगितलं. मिस मालिनीशी बोलताना नंदीश म्हणाला," मी लग्नाला गेलो होतो. पण तसं झालं नाही. आणि मला आत्ताच कळले की लग्न सध्या होत नाही. या प्रकरणात आता काही न बोललेलंच बरं आहे आणि पलाशला त्याची बाजू मांडण्याची संधी द्या."
advertisement
4/7
"हे पोस्टपोन झालं त्याचं कारण बातम्यांमध्ये आलं तेच होतं. तुम्हाला सांगितलं गेलं होतं आणि इतर सगळ्यांना सांगण्यात आलं होतं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळेच सगळं काही पोस्टपोन करण्यात आलं."
advertisement
5/7
पलाशवर लावलेले आरोप ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं असंही नंदिशने म्हटलं. तो म्हणाला, "मला नंतर बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं की असं सगळं झालं आहे आणि असं सगळं सुरू आहे. मला त्याचं खूप वाईट वाटलं."
advertisement
6/7
स्मृती आणि पलाशचं लग्न मोडल्याचं कळल्यानंतर नंदिशला खूप वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, "कारण काही असेल पण हे लग्न होऊ शकलं नाही. मी त्यांचं प्रेम पाहिलं आहे. मागील 5-6 वर्ष ते एकमेकांसाठी वेडे होते. दोघांची जोडी खूप प्रेमळ आणि चांगली होती."
advertisement
7/7
पलाश मुच्छल स्मृतीची फसवणूक करत होता. लग्नाच्या एक दिवस आधी पलाशला त्याच्या बेडरूममध्ये एका मुलीबरोबर रंगेहात पकडण्यात आलं. टीम इंडियाच्या मुलींनी त्याला बेदम चोप दिला होता, अशी माहिती समोर आली. दोघांचं लग्न मोडण्यामागे हेच कारण ठरलं असं म्हटलं जात आहे. याबाबत स्मृती किंवा पलाश यांच्यातील कोणीच अधिकृत भाष्य केलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
त्याला पण बोलू द्या..! स्मृतीच्या लग्नात होता अभिनेता, घेतली पलाशची बाजू; सांगितलं सांगलीत नेमकं काय घडलं