Sridevi ला तगडी टक्कर देते तिची लहान बहीण, सुपरस्टार अभिनेत्रीपेक्षाही जास्त सुंदर, चौथा PHOTO पाहून म्हणाल वाह!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sridevi Sister Photo : बॉलिवूडची चांदणी श्रीदेवी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुपरहिट अभिनेत्री होत्या, पण तुम्हाला श्रीदेवीची बहीण श्रीलता यांगरबद्दल माहिती आहे का? श्रीलताही श्रीदेवीप्रमाणे सिनेमात आपली नशीब आजमावण्यासाठी आली होती, पण सिनेमात जाण्याआधीच तिने वेगळा मार्ग धरला. एक काळ होता जेव्हा श्रीदेवी आणि श्रीलता यांच्यात अपार प्रेम होते, पण त्यांच्या आईच्या निधनानंतर दोघी वेगळ्या झाल्या.
advertisement
1/9

श्रीदेवी यांची बहिण श्रीलताला स्टार व्हायचं होतं. पण ती कधीच पडद्यावर दिसली नाही. अखेर त्यांनी बहिणीची मॅनेजर होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/9
श्रीदेवी यांच्यासोबत त्यांची बहीण श्रीलता प्रत्येक सेटवर हजर असे. 1972 पासून 1993 पर्यंत श्रीलता बहिणीची मॅनेजर म्हणून सगळे काम सांभाळत होती.
advertisement
3/9
श्रीदेवी आणि श्रीलता यांचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. दोघींना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकत नव्हतं. पण आईच्या निधनानंतर मात्र त्या वेगळ्या झाल्या.
advertisement
4/9
श्रीदेवी आणि श्रीलता यांच्या आईचं चुकीच्या उपचारामुळे निधन झालं होतं. त्यामुळे श्रीदेवीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. श्रीदेवीने ही लढाई जिंकली आणि त्यानंतर त्यांना 7 कोटी रुपये मिळाले.
advertisement
5/9
श्रीलताने पाहिले की श्रीदेवीनं आईच्या मृत्यूवर मिळालेला संपूर्ण पैसा स्वतःकडे ठेवला, त्यामुळे तिला त्यातून हिस्सा मिळवण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागला आणि दोन्ही बहिणी एकमेकांसमोर उभ्या राहिल्या.
advertisement
6/9
कायदेशीर लढाईनंतर श्रीलता केस जिंकली आणि तिला 2 कोटी रुपये मिळाले. यानंतर श्रीदेवी आणि श्रीलता कधीच एकत्र आल्या नाहीत. त्यांच्यातील वाद वाढतच गेला.
advertisement
7/9
श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी दोन्ही बहिणींमधील भांडण सोडविण्याचे खूप प्रयत्न केले. पण दोन्ही बहिणी एकमेकांचा चेहरा पाहायला कधीच तयार झाल्या नाहीत.
advertisement
8/9
2018 मध्ये श्रीदेवींचा आकस्मिक मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
advertisement
9/9
श्रीदेवीच्या दोन्ही मुली जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sridevi ला तगडी टक्कर देते तिची लहान बहीण, सुपरस्टार अभिनेत्रीपेक्षाही जास्त सुंदर, चौथा PHOTO पाहून म्हणाल वाह!