TRENDING:

Still Alive... कोण आहे समय रैना, ज्याच्या जबरदस्त कमबॅकची देशभरात चर्चा? संपत्तीमध्ये बॉलिवूड स्टार्सनाही टाकलं मागे

Last Updated:
Samay Raina Networth: यूट्यूबच्या जगातील मोठे नाव असलेला कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी चर्चेत येण्याचं कारण कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नाही, तर त्याचं कमबॅक आहे.
advertisement
1/7
कोण आहे समय रैना, ज्याच्या जबरदस्त कमबॅकची देशभरात चर्चा? संपत्तीत बॉलिवूड स्टार्सनाही मागे
यूट्यूबच्या जगातील मोठे नाव असलेला कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी चर्चेत येण्याचं कारण कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नाही, तर त्याचा नवा शो आहे. समय गेल्यावर्षी मोठ्या अडचणीत सापडला होता आणि या वादानंतर त्याने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केलं आहे.
advertisement
2/7
२०२५ मध्ये समय रैनाचा 'इंडियाज गॉट टॅलेंट' हा शो प्रचंड वादात सापडला होता. यातील वादग्रस्त विधानांमुळे हा शो त्याला प्लॅटफॉर्मवरून हटवावा लागला होता. इतकंच नाही तर समय रैना आणि इतर काही कॉमेडियन कायद्याच्या कचाट्यात अडकले होते.
advertisement
3/7
काल ७ एप्रिलला समय रैना त्याच्या 'स्टिल अलाईव्ह' (Still Alive) या स्पेशल शोसह पडद्यावर परतला आहे. या शोमध्ये समयने मधल्या काळात त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सामना करावा लागलेल्या गोष्टी आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडल्या. अनेकदा आपल्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या समयने यावेळी मात्र सर्वांनाच इमोशनल केलं.
advertisement
4/7
गेल्यावर्षीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी समयने काही काळ ब्रेक घेतला होता. पण आता आपल्या नवीन शोमध्ये त्याने याच वादावर मिश्किलपणे भाष्य करत चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. मात्र, अनेकांना अजून समय रैना आणि त्याच्या कामाबद्दल पुरेशी माहिती नाही. आज आपण समयबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
5/7
जम्मूमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या समयने ओपन माईकपासून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये 'कॉमिकस्तान २' चा विनर बनून तो घराघरात पोहोचला. आज केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याची तुफान फॅन फॉलोविंग आहे. त्याचे बहुतांश सर्वच शो सोल्ड आऊट होतात.
advertisement
6/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या घडीला समय रैनाची एकूण संपत्ती २० ते २५ कोटींच्या घरात आहे. यूट्यूब, ब्रँड कोलॅबोरेशन आणि जागतिक स्तरावरील लाइव्ह शोज हे त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत. विशेष म्हणजे, न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' सारख्या भव्य ठिकाणी परफॉर्म करणारा तो मोजक्या भारतीय कॉमेडियन्सपैकी एक आहे.
advertisement
7/7
मुंबईत स्थायिक झालेला समय आपलं कौटुंबिक आयुष्य कॅमेऱ्यापासून दूर ठेवणंच पसंत करतो. आपल्या काश्मिरी मुळांचा त्याला सार्थ अभिमान आहे आणि अनेकदा त्याच्या विनोदांमधून तो आपल्या वैयक्तिक संघर्षाचा उल्लेखही करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Still Alive... कोण आहे समय रैना, ज्याच्या जबरदस्त कमबॅकची देशभरात चर्चा? संपत्तीमध्ये बॉलिवूड स्टार्सनाही टाकलं मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल