TRENDING:

गोविंदाची प्रॉपर्टी 140 कोटी, पण सुनीता अहुजाची एकूण मालमत्ता किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही

Last Updated:
Sunita Ahuja Net Worth : गोविंदा यांच्यासोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर, अनेकांना असा प्रश्न पडला आहे की सुनीता आहूजा यांची स्वतःची कमाई किती आहे.
advertisement
1/10
गोविंदाची प्रॉपर्टी 140 कोटी, पण सुनीता अहुजाची एकूण मालमत्ता किती?
मुंबई: बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सगळ्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
advertisement
2/10
याच दरम्यान, अनेक लोक सुनीता आहूजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या संपत्तीबद्दलची एक खास गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
advertisement
3/10
सुनीता आहूजा यांचा जन्म १९६७ साली झाला असून, त्या ५७ वर्षांच्या आहेत. त्यांचं मूळ नाव सुनीता मुंजाल आहे. सुनीता आणि गोविंदा यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटासारखी आहे. जेव्हा सुनीता गोविंदा यांना भेटल्या, तेव्हा गोविंदा चित्रपटसृष्टीत आले नव्हते.
advertisement
4/10
त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ते दोघे एकमेकांना पत्र पाठवायचे आणि तासंतास फोनवर बोलायचे. अखेर १९८७ मध्ये त्यांनी लग्न केलं.
advertisement
5/10
पण, त्यावेळी गोविंदा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे त्यांनी लग्नाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. त्यांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुलं आहेत.
advertisement
6/10
गोविंदा यांच्यासोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर, अनेकांना असा प्रश्न पडला आहे की सुनीता आहूजा यांची स्वतःची कमाई किती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता आहूजा यांच्याकडे २५ ते ३० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
advertisement
7/10
याउलट गोविंदाची एकूण संपत्ती तब्बल १४० कोटींच्या आसपास आहे. ही रक्कम त्यांचा पती गोविंदाच्या एकूण कमाईच्या तुलनेत कमी असली, तरीही एका स्टारच्या पत्नीसाठी खूप मोठी आहे.
advertisement
8/10
सुनीता आहूजा यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ब्रँड एंडोर्समेंट्स, त्यांचे पती गोविंदा यांच्या अभिनयातून मिळणारे उत्पन्न आणि त्यांच्यासोबत केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारे पैसे आहेत.
advertisement
9/10
अलीकडच्या काळात सुनीता आहूजा यांनी त्यांचा स्वतःचा युट्युब चॅनल देखील सुरू केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना आता स्वतःची कमाई करण्याची संधी मिळाली आहे.
advertisement
10/10
गोविंदा आणि सुनीता आहूजा यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना फक्त एक अफवा असल्याचं म्हटलं आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची ही माहिती अनेकांना चकित करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गोविंदाची प्रॉपर्टी 140 कोटी, पण सुनीता अहुजाची एकूण मालमत्ता किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल