TRENDING:

'तुम्ही लाज विकली का?' पॅप्सच्या अंगावर धावून गेला, कॅमेरा खेचला! धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन करायला गेलेल्या सनीचा रुद्र अवतार

Last Updated:
Dharmendra Asthi Visarjan: आज ३ डिसेंबर रोजी हरिद्वार येथील हर की पौडी घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. अशातच अभिनेता सनी देओलचा पारा चढला आणि तो तिथे असलेल्या पॅप्सवर चांगलाच संतापलेला दिसला.
advertisement
1/8
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन करायला गेलेल्या सनी देओलचा रुद्र अवतार
मुंबई: २४ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांनाही हे दुःख पचवणे कठीण जात आहे.
advertisement
2/8
दरम्यान, आज ३ डिसेंबर रोजी हरिद्वार येथील हर की पौडी घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. मात्र अशातच अभिनेता सनी देओलचा पारा चढला आणि तो तिथे असलेल्या पॅप्सवर चांगलाच संतापलेला दिसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
3/8
सकाळच्या सुमारास धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाचा विधी पार पडला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी साडेनऊ वाजता धर्मेंद्र यांचा नातू करण देओल याने आजोबांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या.
advertisement
4/8
या अत्यंत भावनिक क्षणी करणला आपले अश्रू अनावर झाले आणि तो खूप भावूक झालेला दिसला. कुटुंबाने हा विधी अत्यंत गुप्तपणे आणि खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
5/8
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाच्या वेळी काही पापाराझींनी तिथे गर्दी करून फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. कुटुंबाच्या दुःखाच्या क्षणाचे चित्रीकरण पाहून सनी देओलला खूप राग आला.
advertisement
6/8
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, संतापलेला सनी देओल थेट एका फोटोग्राफरजवळ गेला. त्याने त्या पापाराझीचा कॅमेरा हिसकावून घेतला.
advertisement
7/8
राग व्यक्त करताना सनीने त्या फोटोग्राफरला थेट विचारले, "तुम्ही लोकांनी लाज विकली आहे का? तुम्हाला पैसे पाहिजेत? किती पैसे पाहिजेत?" अशा दुःखाच्या आणि खाजगी क्षणांमध्ये कुटुंबाच्या भावनांचा आदर न केल्याबद्दल सनी देओल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
advertisement
8/8
८९ वर्षीय धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुम्ही लाज विकली का?' पॅप्सच्या अंगावर धावून गेला, कॅमेरा खेचला! धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन करायला गेलेल्या सनीचा रुद्र अवतार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल