Suraj Chavan Wedding : 'सूरजला लग्नाची इतकी घाई झालीये की...', अंकिताने केली भावाची पोलखोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Wedding : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्न करतोय. त्याच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सूरज लग्नासाठी किती उत्सुक आहे याविषयी अंकिताने सांगितलं.
advertisement
1/7

बिग बॉस 19 चा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्न करतोय. अंकिता वालावलकरने नुकतंच सूरजचं केळवण केलं.
advertisement
2/7
यावेळी अंकिताने सूरजची होणारी बायको पहिल्यांदा सर्वांसमोर आणली. संजना असं सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. सूरजच्या होणाऱ्या बायकोला पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
3/7
अंकिताने सूरज आणि संजना यांचं केळवण केलं. केळवणासाठी दोघे मुंबईला आले होते. अंकिताना सूरजला त्याच्या लग्नाची कपड्यांची खरेदी करून दिली. यावेळी अंकिताने सूरजला लग्नाची घाई झाली आहे असं सांगितलं.
advertisement
4/7
अंकिताने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये लग्नाची संपूर्ण खरेदी कशी केली हे दाखवलं. अंकिताने व्हिडीओमध्ये सांगितलं, "ही सूरजची होणारी बायको आहे. सूरजने पटकन निर्णय घेतला की मला लग्न करायचं आहे. तेवढंच पटकन आम्ही शॉपिंग करायला आलोय."
advertisement
5/7
"पटकन शॉपिंग करायची आहे कारण लग्नाची डेटही अगदी जवळची काढली आहे, त्याला लग्नाची इतकी घाई झालेली आहे की त्याने पटापट सगळ्या गोष्टी ठरवल्यात."
advertisement
6/7
सूरजच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही पण पुढच्या काही दिवसांतच तो लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती अंकिताच्या व्हिडीओमधून समोर आली आहे.
advertisement
7/7
सूरजचं बारामतीमध्ये नवं घर देखील तयार झालं आहे. लग्नानंतर तो बायकोसह त्याच्या नव्या घरात राहायला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला हे घर बांधून दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Wedding : 'सूरजला लग्नाची इतकी घाई झालीये की...', अंकिताने केली भावाची पोलखोल