हृदयात 95% ब्लॉकेज, एन्जियोप्लास्टी वेळी पूर्ण शुद्धीत होती; सुष्मिता सेनचा धक्कादायक खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सुष्मिता सेनला 2023 मध्ये हार्ट अटॅक आला. तिच्या हृदयात 95 टक्के ब्लॉकेजेस होते. एन्जियोप्लास्टीवेळी ती पूर्ण शुद्धीत होती. नेमतं काय घडलं?
advertisement
1/7

हार्ट अटॅक</a> आला होता. तिच्या हृदयात 95 टक्केे ब्लॉकेजेस असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तिची एन्जियोप्लास्टी केली." width="1080" height="1350" /> माजी मिस वर्ल्ड सुष्मिता सेनला 2023 मध्ये हार्ट अटॅक आला होता. तिच्या हृदयात 95 टक्केे ब्लॉकेजेस असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तिची एन्जियोप्लास्टी केली.
advertisement
2/7
या घटनेनंतर दोन वर्षांनी सुष्मिता सेननं एक धक्कादायक माहिती दिली आहे. तिची एन्जियोप्लास्टी करण्यात आली तेव्हा ती पूर्णपणे शुद्धीत होती असं तिनं सांगितलं. एनेस्थेशिया घेण्यास तिने पूर्ण नकार दिला होता.
advertisement
3/7
सुष्मिताने दिव्या जैनसोबत बोलताना हा धक्कादायक खुलासा केला. सुष्मिता म्हणाली, "जेव्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येतो आणि तुम्ही शुद्धीत असता तेव्हा कळतं की आयुष्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचणं किती कठीण आहे. तुम्ही जेव्हा त्या टोकाला पोहोचला तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती मागे आहात आणि तुम्हाला त्यातला फरकही जाणवतो."
advertisement
4/7
"मला जाणवले की मी अजूनही सर्व काही अनुभवू शकते. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात, ब्रँड सुष्मिता म्हणून, आणि दोन मुलांच्या सिंगल मदर म्हणून जबाबदाऱ्या सांभाळायच्या होत्या. माझ्या आयुष्यात खूप काही घडलं पण मी कधीच मागे हटले नाही. "
advertisement
5/7
सुष्मिता पुढे म्हणाली, "माझे विचार सोडून सगळं क्षणिक आहे, हार्ट अटॅकही. मी जर यातून वाचले नसते तर तुमच्यासाठी काहीच स्टोरी राहिली नसती. माझ्या सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे की मी किती इमपेशंट आहे. मी त्यांना सांगितलं होतं की या प्रोसेसमध्ये मला बेशुद्ध व्हायचं नाही. माझ्यासमोर एक ऑप्शन होता एक तर सहन करा किंवा बेशुद्ध व्हा किंवा बेशुद्ध होऊन झोपा ते कधीच जागं न होण्यासाठी."
advertisement
6/7
सुष्मिताने सांगितलं की सर्जरीवेळी पूर्ण शुद्धीत होते. "माझ्या डॉक्टरांनी खूप काळजी घेतली. मला बेशुद्ध होणं आवडत नाही कारण मला माझ्या शरीरावर कंट्रोल हवा होता. मी पूर्ण प्रोसिजर दरम्यानही शुद्धीत होते आणि मला सर्व गोष्टी जाणवत होत्या," असं तिनं सांगितलं.
advertisement
7/7
हार्ट अटॅकनंतर फक्त 15 दिवसांनी सुष्मिता 'आर्या 3'च्या सेटवर परतली. ती म्हणाली, "शोमध्ये लीड रोल निभावणे सोपे नाही. 500 लोकांच्या टीमची जबाबदारी माझ्यावर होती. माझ्या गैरहजेरीत त्यांची डेली वेजेस थांबू नयेत, म्हणून मी लगेच सेटवर परतण्याचा निर्णय घेतला. मला माझे काम सुरू ठेवायचे होते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हृदयात 95% ब्लॉकेज, एन्जियोप्लास्टी वेळी पूर्ण शुद्धीत होती; सुष्मिता सेनचा धक्कादायक खुलासा