TRENDING:

एकच फिल्म, सुपरस्टारबरोबर डेब्यू; आज 50 हजार कोटींची मालकीण आहे ही मराठी अभिनेत्री

Last Updated:
सुपरस्टार सोबत डेब्यू केला. सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चालला. पण एकच सिनेमा करून अभिनेत्री गायब झाली. पण आज ती 50 हजार कोटींची मालकीण आहे.
advertisement
1/9
एकच फिल्म, सुपरस्टारबरोबर डेब्यू; आज 50 हजार कोटींची मालकीण आहे ही मराठी अभिनेत्री
अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवलं आहे. अनेक अभिनेत्री आता मराठीतही काम करत आहेत. अशीच एक मराठी अभिनेत्री जिनं सुपरस्टार अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू.
advertisement
2/9
तिचा सुपरस्टारबरोबर एक एकमेव सिनेमा ठरला. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला. पण सिनेमा करून ही अभिनेत्री गायब झाली. आजपर्यंत की मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही.
advertisement
3/9
मोठ्या पडद्यापासून आणि लाइमलाईटपासून दूर असली तरी ही अभिनेत्री आज 50 हजार कोटींची मालकीण आहे. कोण आहे ही मराठी अभिनेत्री 
advertisement
4/9
आपण  बोलत आहोत अभिनेत्री गायत्री जोशीबद्दल. जिने आपल्या एकाच चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीवर एक अमिट छाप सोडली आणि प्रेक्षकांची मनं कायमची जिंकली. अभिनयापूर्वी ती एक व्हिडिओ जॉकी आणि एक सामान्य मॉडेल होती, पण तिचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे, अभिनयापासून दूर असूनही, ती कोट्यवधी डॉलर्सची मालक आहे आणि आलिशान जीवन जगते.
advertisement
5/9
एके काळी एक सामान्य मॉडेल असलेली गायत्री आता भारत आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणली जाते. तिने आपल्या करिअरची सुरुवात चॅनल व्ही इंडियावर व्हिडिओ जॉकी म्हणून केली. त्यानंतर तिने फेमिना इंडिया सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
advertisement
6/9
गायत्री जोशी 1999 च्या फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतील अंतिम पाच स्पर्धकांपैकी एक होती. 2000 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर तिचा राज्याभिषेक झाला. तिने जपानमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल 2000 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
advertisement
7/9
2004 साली आलेल्या आशुतोष गोवारीकरच्या स्वदेश सिनेमातून तिने डेब्यू केला. या सिनेमात तिनं सुपरस्टार शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर केली. त्यानंतर गायत्री जोशीने बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर अवघ्या एका वर्षातच 2005 मध्ये तिने प्रसिद्ध उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले. तिचे पती सध्या 65 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत आणि आता गायत्री जोशीदेखील त्यांच्यासोबत श्रीमंतांच्या यादीत सामील झाली आहे.
advertisement
8/9
गायत्री जोशीचे पती विकास ओबेरॉय, हे ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्याचे बाजार भांडवल अंदाजे 30,000 कोटी रुपये आहे. 52 वर्षीय विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती जवळपास 50 हजार कोटींच्या आसपास आहे.  अभिनेत्री गायत्री पती विकास आणि दोन मुलांसोबत मुंबईत राहते. ती आता केवळ चित्रपटसृष्टीपासून दूर नाही तर सोशल मीडियावरही सक्रिय नाही.
advertisement
9/9
कॉलेजमध्ये असताना, गायत्री जोशीने बॉम्बे डाईंग, फिलिप्स, पॉन्ड्स, गोदरेज, सनसिल्क आणि एलजीसाठी मॉडेलिंग केले, तसेच शाहरुख खानसोबत ह्युंदाईच्या जाहिरातींमध्येही ती दिसली. तिने 2001 साली 'सीझन्स'च्या कॅटलॉग आणि कॅलेंडरसाठीही मॉडेलिंग केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकच फिल्म, सुपरस्टारबरोबर डेब्यू; आज 50 हजार कोटींची मालकीण आहे ही मराठी अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल