TRENDING:

Disha Vakani: कधीकाळी B- ग्रेड सिनेमात काम करायची दयाबेन, आता झालीये 2 मुलांची आई, ओळखूही येईना

Last Updated:
गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतले कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दया भाभीचे पात्र साकारणारी दिशा वाकानी सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. दिशाच्या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या तिच्या नव्या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
1/7
कधीकाळी B-ग्रेड सिनेमात काम करायची दयाबेन, आता झालीये 2 मुलांची आई, ओळखूही येईना
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून घराघरांत सर्वच कलाकार प्रसिद्ध झालेले आहेत. मालिकेमध्ये दया बेनचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकानी हिला विशेष प्रसिद्धी मिळालेली आहे. अभिनेत्रीने मालिकेतून ब्रेक घेतल्यापासून ती पुन्हा मालिकेमध्ये परतलीच नाही.
advertisement
2/7
2017 साली मालिकेतून एक्झिट घेतलेल्या दिशाने 8 वर्षे झाले आहेत, अजूनही ती मालिकेमध्ये परतलेली नाही. अनेकदा ती मालिकेमध्ये येणार असल्याची चर्चा सुद्धा झाली होती. पण अद्यापही ती प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. अशातच दिशाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती ओळखूही येत नाहीये. 
advertisement
3/7
निर्माते असित कुमार मोदी यांना दिशा पुन्हा मालिकेमध्ये परतेल, या आशेमध्ये होते. पण अजूनही ती मालिकेमध्ये परतली नाही. दिशा येत नसल्यामुळे निर्मात्यांनी नव्या दयाला मालिकेमध्ये आणलं होतं. पण चाहत्यांना ते काही आवडलं नाही. त्यामुळे मालिकेचा मोठ्या फरकाने टीआरपी सुद्धा पडला.
advertisement
4/7
दिशाने प्रेग्नेंसीच्या कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. दिशा दोन मुलांची आई झाली असून सध्या ती गृहिणीच आहे. मुलं लहान असल्यामुळे अभिनेत्रीचे लक्ष त्यांच्याकडेच असणार आहे, नाही की आपल्या अभिनयाकडे. पण असं असलं तरीही निर्मातेही आणि चाहतेही तिच्या कमबॅकसाठी इच्छुक आहेत.
advertisement
5/7
जरीही दिशाला 'तारक मेहता का...' शोने स्टारडम दिलं असलं तरीही ती फार वर्षांपासून स्ट्रगल करतेय. फार कमी वयापासून तिने नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्याचं श्रेय ती कायमच वडील भीम वकानी यांना देते. ते गुजराती इंडस्ट्रीमध्ये कलाकार होते. फक्त मालिकेतच नाही तर, चित्रपटांमध्येही दिशाने काम केले.
advertisement
6/7
बाल कलाकार म्हणून सुरू केलेल्या करियरमध्ये दिशाने देवदास, जोधा अकबर, मंगल पांडे, लव्ह स्टोरी या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने सपोर्टिंग रोल म्हणून काम केले. दिशाने आपल्या फिल्मी करियरमध्ये प्रत्येक धाटणीच्या भूमिका साकारलेल्या आहेत.
advertisement
7/7
फार कमी जणांना माहितीये, दिशाने 1997 मध्ये तिच्या स्ट्रगलच्या काळात एका बी ग्रेड चित्रपटामध्ये काम केले होते. ज्याचं नाव, 'कमसिन- द अनटच्ड' असं होतं. त्या चित्रपटामध्ये तिने एक ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला फार काही शिकायला मिळालं, अशी दिशाची प्रतिक्रिया होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Disha Vakani: कधीकाळी B- ग्रेड सिनेमात काम करायची दयाबेन, आता झालीये 2 मुलांची आई, ओळखूही येईना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल