TRENDING:

Madhavi Bhide : मालिकेत विकते पापड-लोणची; खऱ्या आयुष्यात माधवी भिडे कोट्यवधींची मालकीन

Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Madhavi Bhide : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली माधवी भिडे अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी खऱ्या आयुष्यात मात्र कोट्यवधींची मालकीन आहे.
advertisement
1/7
मालिकेत विकते पापड-लोणची; खऱ्या आयुष्यात माधवी भिडे कोट्यवधींची मालकीन
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेत गोकुळधाम सोसायटीची महत्त्वाची सदस्य असणारी माधवी भिडे अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी खऱ्या आयुष्यात कोट्यवधींची मालकीन आहे.
advertisement
2/7
सोनालिका जोशीचा जन्म महाराष्ट्रातील एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला आहे. नाटकांमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे अनेक मराठी मालिकांमध्ये ती झळकली.
advertisement
3/7
44 वर्षीय अभिनेत्रीचा रील आणि रिअल दोन्ही आयु्ष्यात उद्योग आहे. मालिकेत माधवी भिडे लोणची-पापड विकत असली तरी खऱ्या आयुष्यात सोनालिका जोशी बिझनेस आणि फॅशन डिझायनिंगसोबत जोडली गेली आहे.
advertisement
4/7
मीडिया रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनयासाठी प्रतिदिन अभिनेत्रीला 35-40 हजार रुपये मानधन मिळतं.
advertisement
5/7
सोनालिका जोशी आज कोट्यवधींची मालकीन आहे. तिची एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
advertisement
6/7
सोनालिकाला महागड्या गाड्यांचीदेखील आवड आहे. तिच्याकडे MG Hector, Swanky Maruti आणि Toyota Etios सारख्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे.
advertisement
7/7
सोनालिका समीर जोशीसोबत 2001 मध्ये लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीने बोल बच्चन, चौकोन, वधाा वधाता सारख्या नाटकांत काम केलं आहे. माधवी 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhavi Bhide : मालिकेत विकते पापड-लोणची; खऱ्या आयुष्यात माधवी भिडे कोट्यवधींची मालकीन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल