TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल, या जिल्ह्यासाठी अलर्ट

Last Updated:
29 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप दिसून आली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतेक भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल, या जिल्ह्यासाठी अलर्ट
गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने शेती आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम केला होता. मात्र 29 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप दिसून आली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतेक भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे. तरीही काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात 30 सप्टेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. यामुळे घाटमाथा परिसरातील प्रवाशांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन कामे करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित स्थळी ठेवावा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकतं. गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी वाढलेली असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
7/7
एकूणच 30 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी काही जिल्ह्यांत वातावरण ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर थांबू नये तसेच शेतकऱ्यांनी शेतीमाल आणि जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल, या जिल्ह्यासाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल