Prajakta Mali : गुरूजींचा एक सल्ला अन् प्राजक्ता माळी झाली 'फरसाण गर्ल', सांगितली Inside Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali Farsan Girl : अभिनेत्री प्राजक्ता माळीला फरसाण गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. तिच्या फरसाण गर्ल होण्यामागची एक स्टोरी पहिल्यांदाच तिने सगळ्यांना सांगितली.
advertisement
1/10

प्राजक्ता माळी आणि फरसाण यांचं नातं महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. प्राजक्ताला फरसाण गर्ल असं म्हटलं जातं. प्राजक्ता आणि तिच्या फरसाण खाण्यावरून अनेक मिम्सही पाहायला मिळतात.
advertisement
2/10
फरसाणच्या मागची एक गंमतीशीर गोष्ट प्राजक्तानं सांगितली. एका गुरूजींचा सल्ला प्राजक्तानं ऐकला आणि ती फरसाण गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.
advertisement
3/10
मुंटाशी बोलताना प्राजक्ता म्हणाली, "गेली अनेक वर्ष माझा वाढदिवस महाराष्ट्राची हास्यजत्राच्या शूटींग दरम्यान येतो. तिथेच मी केक कापला आहे. पण कोणाचं डाएट तर कुणाला डायबेटीस आहे. त्यामुळे कोणीच गोड खात नाही. आता गोड खात नाहीत तर असं काही तरी घेऊन जाऊ की जे सगळे खातील."
advertisement
4/10
"आमच्या एका गुरुजींनी मला सांगितलं होतं की, तू वाढदिवासाला काही तरी पिवळ्या रंगातचं खाद्यपदार्थ दान कर."
advertisement
5/10
प्राजक्ता पुढे म्हणाली, "माझ्या ड्रायव्हर काकांनी सातऱ्यात फरसाणाचा कारखाना काढला होता. आम्ही साताऱ्याला गेलो तेव्हा त्यांनी मला आग्रहानं तिथे नेलं. त्यांचं उत्कृष्ट असं फरसाण खाऊन मनातल्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या."
advertisement
6/10
"त्यानंतर माझ्या पुढच्या सगळ्या वाढदिवसाला मी आमच्या सेटवर सगळ्यांना प्रत्येकी अर्धा किलो फरसाण वाटलं. तेव्हापासून माझं फरसाणाशी घट्ट नातं जमलं."
advertisement
7/10
प्राजक्ता माळी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची हास्यजत्रेचा भाग आहे. तिच्या उत्कृष्ट निवेदनाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. हास्यजत्रेचा नवा सीझन सुरू झाला आहे. त्यातही प्राजक्ता दमदार निवेदन करताना दिसतेय.
advertisement
8/10
फरसणाबरोबरच हास्यजत्रेत प्राजक्ताचं वाह दादा वाह हे वाक्य देखील खूप फेमस झालं आहे. या वाक्यासाठीही प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिच्या या वाक्याने अनेक टीशर्टही त्यांनी लाँच केलेत.
advertisement
9/10
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास तिचा फुलवंती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सिनेमाला अनेक पुरस्कार देखील मिळाले.
advertisement
10/10
'रानबाजार' या वेब सीरिजनंतर प्राजक्ताची 'देवखेळ' हा नवी सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी 5 वर ही सीरिज रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : गुरूजींचा एक सल्ला अन् प्राजक्ता माळी झाली 'फरसाण गर्ल', सांगितली Inside Story