Guess Who : एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे कमवायचा, आज अभिनेता कोट्यवधींचा मालक, कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एक काळ असा होता, जेव्हा हा अभिनेता मुंबईतील मायानगरीत ट्रेनमध्ये गाणी गाऊन पोट भरायचा. पण आज तोच कलाकार एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपयांची तगडी फी घेतो!
advertisement
1/8

मुंबई: ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही म्हण एका उगवत्या बॉलिवूड सुपरस्टारच्या आयुष्याला तंतोतंत लागू होते, ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीत कोणताही ‘गॉडफादर’ नसताना स्वतःचं स्थान निर्माण केलं.
advertisement
2/8
एक काळ असा होता, जेव्हा हा अभिनेता मुंबईतील मायानगरीत ट्रेनमध्ये गाणी गाऊन पोट भरायचा. पण आज तोच कलाकार एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपयांची तगडी फी घेतो! आज तब्बल ८० कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला हा अभिनेता कोण आहे?
advertisement
3/8
ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलत आहोत, त्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही आणि रिॲलिटी शोमधून केली. हा अभिनेता आहे, आयुष्मान खुराना!
advertisement
4/8
चंदीगढमध्ये जन्मलेल्या आयुष्मान २००४ साली प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘रोडीज’ जिंकून लाइमलाइटमध्ये आला. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, कॉलेजच्या दिवसांमध्ये तो ट्रेनमध्ये प्रवास करताना गिटार वाजवायचा आणि गाणी गायचा. लोक त्याला पैसेही द्यायचे, ज्यामुळे त्याचा खर्च निघायचा.
advertisement
5/8
अभिनयाचं स्वप्न घेऊन आयुष्मान जेव्हा मुंबईत आला, तेव्हा त्याला खूप संघर्ष करावा लागला. तो एमबीबीएस करणाऱ्या एका मित्राच्या होस्टेलमध्ये लपून राहायचा आणि ऑडिशनसाठी जाताना मित्राचा कोट घालून जायचा.
advertisement
6/8
छोट्या शहरात वाढलेला आणि इतका हँडसम नसल्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्याला ‘हिरो मटेरियल’ मानलं नाही आणि रिजेक्ट केलं. पण, त्याने हार मानली नाही. पोट भरण्यासाठी त्याने रेडिओ जॉकी म्हणूनही काम केलं.
advertisement
7/8
२०१२ मध्ये जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन हाऊसखाली बनलेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून आयुष्मानला मोठा ब्रेक मिळाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
8/8
‘दम लगा के हइसा’, ‘अंधाधुंध’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बधाई हो’ यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्याने दिले. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, एकेकाळी ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे कमावणाऱ्या या सुपरस्टारची आजची एकूण संपत्ती ८० कोटींहून अधिक आहे! लवकरच त्याचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे कमवायचा, आज अभिनेता कोट्यवधींचा मालक, कोण आहे तो?