TRENDING:

तमन्ना भाटियाचं हे गाणं 1000000000 लोकांनी पाहिलं, अजूनही पाहतायत, व्ह्यूजचा रेकॉर्ड मोडला

Last Updated:
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाचं एक गाणं 1000000000 लोकांनी पाहिलं आहे. या गाण्याने व्ह्यूजचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
1/7
तमन्ना भाटियाचं हे गाणं 1000000000 लोकांनी पाहिलं, आता व्ह्यूजचा मोडला रेकॉर्ड
तमन्ना भाटिया यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की स्टाइल, एक्स्प्रेशन आणि स्क्रीन प्रेझेन्सच्या बाबतीत त्यांची सर कुणालाच नाही. हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मधील सुपरहिट गाणं ‘आज की रात’ हे केवळ एक डान्स नंबर न राहता, प्रेक्षकांना वेड लावणारा एक भव्य व्हिज्युअल अनुभव ठरला आहे.
advertisement
2/7
स्त्री 2 मधील हिट गाणं ‘आज की रात’ कोण विसरू शकतं? या गाण्यात तमन्ना भाटियाचा डान्स आणि तिच्या अदांनी सगळ्यांच्या हृदयावर जणू अधिराज्य गाजवलं. आजही हे गाणं सोशल मीडियावरील रील्समध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की हे 2025 सालातील सर्वात हिट गाणं ठरलं आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही या गाण्याबद्दल लोकांची क्रेझ कमी झालेली नाही. याच कारणामुळे आधीच 500 मिलियन व्ह्यूज पार केलेल्या या गाण्याने आता 1 बिलियन व्ह्यूजचा टप्पाही ओलांडला आहे.
advertisement
3/7
तमन्ना भाटियाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की तिच्या प्रसिद्ध गाण्याला यूट्यूबवर 1 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टसोबत तिने गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे काही न पाहिलेले (BTS) क्लिप्सही शेअर केले आहेत.
advertisement
4/7
तमन्नाने BTS व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शूट झालेला सीन मॉनिटरवर लक्षपूर्वक पाहताना दिसते. तिच्यासोबत कोरिओग्राफर विजय गांगुली आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीम उपस्थित असते. सीन पाहून विजय शॉटची प्रशंसा करतो आणि हलक्याफुलक्या अंदाजात अजून एक टेक घेण्याची सूचना करतो. यावर तमन्ना हसत-हसत मजेशीर पद्धतीने लगेच “नाही!” असं म्हणते. दुसऱ्या व्हिडीओमध्ये तमन्ना को-ॲक्टर्ससोबत परफॉर्म केल्यानंतर स्वतः पुढे जाऊन सीन तपासताना दिसते.
advertisement
5/7
तमन्नाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावरून अनेक दावे केले जाऊ लागले. असा दावा केला जात आहे की तमन्ना आता केवळ एका मिनिटाच्या डान्स परफॉर्मन्ससाठी सुमारे 1 कोटी रुपये फी घेते. हे दावे समोर येताच इंटरनेटवर यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
6/7
तमन्ना भाटिया लवकरच आपल्या आगामी ‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक मिश्रा आणि अरुणाभ कुमार एकत्र करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तमन्नासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
advertisement
7/7
तमन्ना भाटियाचं 'आज की रात' हे गाणं 1000000000 लोकांनी पाहिलं आहे. या गाण्याने व्ह्यूजचा रेकॉर्ड मोडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तमन्ना भाटियाचं हे गाणं 1000000000 लोकांनी पाहिलं, अजूनही पाहतायत, व्ह्यूजचा रेकॉर्ड मोडला
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल