TRENDING:

Guess Who: दहावीत शिकताना शिक्षिकेने केलं KISS, वर्गातील 'चुंबन' कांडानंतर अभिनेत्यासोबत घडलं भयानक!

Last Updated:
Guess Who: या अभिनेत्याची लव्हस्टोरी आणि आयुष्यातील काही अत्यंत धक्कादायक घटना ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
advertisement
1/12
दहावीत शिकताना शिक्षिकेने केलं KISS, 'चुंबन' कांडानंतर अभिनेत्यासोबत घडलं भयानक!
मुंबई: आपल्या दमदार अभिनयाने आणि अष्टपैलू प्रतिभेने बॉलिवूडमध्ये खास स्थान मिळवणारे अभिनेते, गीतकार आणि लेखक पीयूष मिश्रा यांनी एका मुलाखतीत आणि त्यांच्या पुस्तकात वैयक्तिक आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उघड केल्या आहेत.
advertisement
2/12
'गँग्स ऑफ वासेपूर' फेम या अभिनेत्याची लव्हस्टोरी आणि आयुष्यातील काही अत्यंत धक्कादायक घटना ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
advertisement
3/12
पीयूष मिश्रा यांनी त्यांच्या लेखन प्रवासावर बोलताना सांगितले की, ते आत्मचरित्र लिहीत नसून, एक कादंबरी लिहीत आहेत. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाचा अविस्मरणीय किस्सा सांगितला.
advertisement
4/12
पीयूष मिश्रा दहावीत असताना त्यांना त्यांच्या शिक्षिका 'मिस जिंजर' यांच्यावर प्रेम झाले होते. त्या मूळच्या केरळच्या आणि खूप सुंदर होत्या. मिस जिंजर अनेकदा पीयूषला गाणे गाण्यासाठी बोलावून घ्यायच्या.
advertisement
5/12
पीयूषच्या टॅलेंटवर त्या खूप प्रभावित होत्या. गप्पा आणि मजामस्तीमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आले. एके दिवशी शिक्षिकेने पीयूषला किस केले होते.
advertisement
6/12
एके दिवशी शाळेत फारसे कोणी नसताना, नेहमीप्रमाणे गाणे ऐकल्यानंतर पीयूष भावूक झाले. त्यांना पाहून शिक्षिकाही भावूक झाल्या आणि त्या दोघांनी एकमेकांच्या ओठांवर किस केले.
advertisement
7/12
शाळेत झालेल्या या घटनेमुळे पीयूष मिश्रा यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. कोणीतरी त्यांना किस करताना पाहिले आणि घरी खबर दिली.
advertisement
8/12
संतप्त झालेल्या वडिलांनी पीयूषला काठीने खूप मारले आणि त्यांची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली. या घटनेनंतर मिस जिंजर यांनीही नोकरी सोडली.
advertisement
9/12
या घटनेनंतर कॉलेजमध्ये असताना पीयूष मिश्रा पुन्हा एकदा प्रेमात पडले, पण इथेही त्यांना वडिलांच्या कठोरतेचा सामना करावा लागला. २०व्या वर्षी पीयूष वैद्यकीय महाविद्यालयात असताना त्यांना २८ वर्षीय एका मुलीच्या सौंदर्यावर आणि साधेपणावर प्रेम झाले.
advertisement
10/12
दोघे फक्त मित्र असले तरी, ग्वाल्हेरमध्ये त्यांच्या वडिलांचा मान असल्याने घरी ही गोष्ट लगेच पोहोचली. पीयूषच्या आईला या गोष्टीचा खूप राग आला आणि त्या थेट त्या मुलीच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या.
advertisement
11/12
आईच्या या वागण्यामुळे संतापून पीयूष मिश्रा यांनी आपली मनगटाची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्यांनी वडिलांशी असलेले प्रेमळ नाते संपवले आणि त्यानंतर ते वडिलांना 'सर' म्हणून हाक मारू लागले.
advertisement
12/12
अखेरीस पीयूष मिश्रा यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे प्रिया नारायणन यांच्याशी लग्न करून आपले जीवन नव्याने सुरू केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: दहावीत शिकताना शिक्षिकेने केलं KISS, वर्गातील 'चुंबन' कांडानंतर अभिनेत्यासोबत घडलं भयानक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल