TRENDING:

Tejashri Pradhan : तेजश्री प्रधान पाठोपाठ तिच्या हिरोचीही झी मराठीवर वापसी! तिलाच देणार टक्कर

Last Updated:
अभिनेत्री तेजश्री प्रधाननं 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अर्ध्यात सोडून झी मराठीवर वापसी केली. त्यानंतर आता तिचा हिरो देखील झी मराठी वाहिनीवर परतला आहे.
advertisement
1/10
तेजश्री प्रधान पाठोपाठ तिच्या हिरोचीही झी मराठीवर वापसी! तिलाच देणार टक्कर
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करतेय. या मालिकेच्या निमित्तानं तिनं पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक केलं.
advertisement
2/10
झी मराठीच्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली होती. या मालिकेनंतर तिनं झीवर अनेक मालिकेत काम केलं. पण मोठ्या ब्रेकनंतर ती स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसली.
advertisement
3/10
परंतू 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका तेजश्रीनं अर्ध्यातच सोडली. तिनं मालिका का सोडली असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना अचानक ती झी मराठीच्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत दिसली.
advertisement
4/10
एका मालिका अर्धवट सोडून दुसऱ्या वाहिनीवर नवी मालिका सुरू केल्यानंतर तेजश्रीला ट्रोल देखील करण्यात आलं. पण तेजश्रीला झी मराठीवर पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक आनंदीही होते.
advertisement
5/10
दरम्यान आता तेजश्रीनंतर तिचा हिरो देखील झी मराठी वाहिनीवर परतला आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील तिचा नवरा सागर म्हणजेच अभिनेता राज हंचनळे झी मराठीच्या मालिकेत दिसणार आहे.
advertisement
6/10
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दोघांची मुक्ता आणि सागर ही जोडी खूप फेमस झाली होती. तेजश्रीच्या एक्झिटनंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं मुक्ताची भूमिका साकारली होती.
advertisement
7/10
झी मराठीच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेत राज हंचनाळेची एन्ट्री पाहायला मिळत आहे. 'सनई चौघडे' असं राजच्या नव्या मालिकेचं नाव आहे.
advertisement
8/10
या मालिकेत तो हिरोच्या भूमिकेत आहे. मोठ्या राजवाड्यासमोर त्याची आलिशान कारमधून फिल्मी एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या मालिकेत हर्षबरोबर अभिनेत्री मेघना ऐरंडे, चिन्मयी साळवी, सुहास शिरसाट हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
9/10
राजच्या मालिका विश्वातील करिअरची सुरुवात झी मराठीवरच झाली होती. झी मराठीच्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत त्यानं सनी दाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळाला होता.
advertisement
10/10
त्यानंतर त्याने सन मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारली. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचाही तो हिरो होता. आता 'सनई चौघडे' या मालिकेत राजला प्रमुख अभिनेता म्हणून पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : तेजश्री प्रधान पाठोपाठ तिच्या हिरोचीही झी मराठीवर वापसी! तिलाच देणार टक्कर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल