बलिदान बॅज मिळवणाऱ्या मेजर दीक्षा नेमक्या कोण आहेत? निधड्या छातीच्या या महिला ऑफिसरचा थरारक प्रवास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
संघर्ष, शौर्य अन् सर्वोच्च सन्मान! देशाच्या लेकीचा लष्करातील सर्वात मोठा गौरव; मेजर दीक्षा सी. यांनी घडवला नवा इतिहास
advertisement
1/7

भारतीय लष्कराच्या इतिहासात एका सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा विक्रमाची नोंद झाली आहे. लष्करातील सर्वात 'एलिट' मानल्या जाणाऱ्या पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची बलिदान बॅजसाठी निवड झाली आहे.
advertisement
2/7
मेजर दीक्षा सी. मुदादेवन्नवर यांनी हा बहुमान पटकावून इतिहास रचला असून, हा सन्मान मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय सैन्यात बलिदान बॅज मिळवणे हे प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे स्वप्न असते.
advertisement
3/7
हा बॅज केवळ पॅरा स्पेशल फोर्सेसच्या कमांडोज्नाच दिला जातो. अत्यंत खडतर प्रशिक्षण, अचाट धैर्य आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असलेल्या निवडक सैनिकांनाच हा मानाचा बॅज मिळतो. दीक्षा यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर या कठीण परीक्षेत यश मिळवले आहे.
advertisement
4/7
मूळच्या कर्नाटकच्या दावणगेरे इथल्या रहिवासी असलेल्या मेजर दीक्षा या पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या आर्मी मेडिकल कोरमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे प्रवेश केला. मात्र, केवळ वैद्यकीय सेवा न देता रणांगणावरील आव्हाने स्वीकारण्याची त्यांची इच्छा होती.
advertisement
5/7
लखनऊ इथे कठीण लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांची निवड पॅरा स्पेशल फोर्समध्ये झाली. विशेष मोहिमांदरम्यान जखमी सैनिकांना तात्काळ वैद्यकीय मदत देणे आणि प्रत्यक्ष युद्धभूमीत सक्रिय राहणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे.
advertisement
6/7
मेजर दीक्षा या केवळ एक धाडसी अधिकारीच नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहेत. ऑपरेशन दोस्त अंतर्गत तुर्कीतील विनाशकारी भूकंपात त्यांनी मोलाची मदत केली. त्या एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना असून कराटेमध्ये एक्सपर्ट आहेत. एक उत्तम बाईक रायडर म्हणूनही त्यांची ओळख आहे. लष्करी सेवेव्यतिरिक्त त्या 'निर्भया' या स्वयंसेवी संस्थेतून सामाजिक कार्यही करतात.
advertisement
7/7
शालेय जीवनात एनसीसी मधून सुरू झालेला हा प्रवास आज बलिदान बॅजपर्यंत पोहोचला आहे. लष्करात केवळ डॉक्टर म्हणून काम न करता, स्पेशल फोर्सेसच्या सर्वात कठीण वातावरणात स्वतःला सिद्ध करणाऱ्या मेजर दीक्षा यांनी महिलांसाठी लष्कराची सर्व कवाडे आता खुली असल्याचे सिद्ध केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
बलिदान बॅज मिळवणाऱ्या मेजर दीक्षा नेमक्या कोण आहेत? निधड्या छातीच्या या महिला ऑफिसरचा थरारक प्रवास