Marathi Serial : 'कमळी'च्या आयुष्यात ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मालिकेतही मोठी घडामोड; काय घडणार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
क्रिकेट म्हटलं की मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव, तणावपूर्ण सामने हा थरार ठरलेला असतो. आता हाच थरार प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांमध्येही अनुभवायला मिळणार आहे. झी मराठीवर मालिकांमध्ये मनोरंजनचा पॉवर प्ले सुरू होणार आहे.
advertisement
1/8

या पॉवर प्लेमध्ये अनेक मालिकांमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंबर वनवर असलेल्या कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. तर तेजश्री प्रधानच्या मालिकेतही मोठा बदल होणार आहे. नेमकं काय घडणार?
advertisement
2/8
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नात्यांची नवी कसोटी पाहायला मिळणार आहे. सावली सगळ्याला कशी सामोरी जाते हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
advertisement
3/8
'लक्ष्मी निवास' मध्ये घरातील सत्तासंघर्ष रंगणार आहे. 'कमळी' मालिके कमळीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. तो काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. कमळीची भेट तिच्या आजी आणि वडिलांशी होणार का?
advertisement
4/8
'तुला जपणार आहे' मालिकेमध्ये रहस्य अधिक गहिरे होणार आहे. या सगळ्याला नायिका कशी सामोरी जाते हे पाहणं इंटेरेस्टिंग ठरणार आहे.
advertisement
5/8
तर 'तारिणी' मालिकेत प्रेम आणि जबाबदारी यांचा खरा कस लागणार आहे. तारिणी या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळेल यात काही शंका नाही. मालिका पाहणं आणखी इंटेरेस्ट्रिंग होणार आहे.
advertisement
6/8
नव्यानं सुरू झालेली 'शुभ श्रावणी' मध्ये नात्यांची गुंतागुंत नव्या रूपात समोर येणार आहे. शुभ आणि श्रावणीच्या आयुष्यात नेमकं काय घडणार हे येत्या भागात कळेल.
advertisement
7/8
तर 'देवमाणूस – मधला अध्याय' मालिकेत लाली आणि गोपाळ मधली चुरस प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. आता कोण कोणावर हावी ठरणार हे मालिकेतील येत्या एपिसोडमध्येच कळेल.
advertisement
8/8
'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये भावनांचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. तेजश्री प्रधान म्हणजेच स्वानंदी आणि समर यांच्यात नेमकं काय घडणार हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : 'कमळी'च्या आयुष्यात ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मालिकेतही मोठी घडामोड; काय घडणार?