Bone Health : तिशीनंतर महिलांनी या 5 त्रासांकडे दुर्लक्ष करू नका! वेळीच सावरा, नाहीतर कमकुवत होतील हाडं
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Bone weakness symptoms : तिशीनंतर अनेक महिलांच्या शरीरात वयाच्या कॅल्शियमची पातळी कमी होऊ लागते. यामुळं हाडांच्या आजाराचा धोका वाढतो. म्हणून काही लक्षण अजिबात दुर्लक्षित करू नका.
advertisement
1/9

महिलांच्या शरीरात वयानुसार खूप बदल होत असतात. यामध्ये प्रेग्नन्सी हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर महिलांच्या शरीरात हाडांची झीज होऊ लागते. म्हणूनच तिशीनंतर महिलांना त्यांच्या आहाराकडे आणि शरीरातील कॅल्शियमच्या पातळीकडे लक्ष देणं गरजेचं असतं.
advertisement
2/9
बहुतांश महिलांना त्यांच्या त्रासांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. पण ही सवय आपल्या वाढत्या वयात महाग पडू शकते. महिला त्यांच्या शरीरातीळ कॅल्शियमच्या पातळीकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे हाडांचा आजार 'ऑस्टिओपोरोसिस' होण्याची शक्यता वाढते.
advertisement
3/9
आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता आहे, हे आधी ओळखता आलं पाहिजे. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यावर आपल्याला काही त्रास जाणवतात. ही कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं असतात. याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
4/9
पाहिलं लक्षण म्हणजे पाय, हात आणि दंडांच्या स्नायूंमध्ये पेटके किंवा क्रम्प्स येणं आणि वेदना होणं. यामध्ये हालचाल करताना मांड्या आणि दंडांमध्ये ताण येति आणि वेदना होऊ शकतात. दुसरं लक्षण म्हणजे पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवणं. हाडं कमकुवत झाल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि चक्कर येऊ शकतात.
advertisement
5/9
तिसरं लक्षण म्हणजे नखं कमकुवत होणं आणि त्वचा कोरडी होणं. चौथं लक्षण असतात दातांच्या समस्या. आपल्या शरीरातलं बरंचसं कॅल्शियम दात आणि हाडांमध्ये साठवलं जातं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपले दात कमकुवत होणं, हिरड्यांमध्ये वेदना आणि दात लवकर किडू शकतात.
advertisement
6/9
सर्वात महत्त्वाचं आणि पाचवं लक्षण म्हणजे हाडे कमकुवत होणं. छोट्याशा दुखापतीमुळेही जर हाडांचं फ्रॅक्चर होत असेल किंवा सतत पाठ आणि मान दुःजात असेल तर ही ऑस्टिओपोरोसिसची सुरुवात असू शकते. म्हणूनच या त्रासांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/9
शरीरात कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत असलेले पदार्थ खा. त्यासोबतच जेवणात पालक, मेथी, ब्रोकोली अशा पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. तसेच तीळ, चिया सीड्स, बदाम आणि अक्रोड यांचाही आहारात समावेश करा.
advertisement
8/9
सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन डी तुम्ही घ्यायला हवं. रोज किमान 15-20 मिनिटे सूर्यप्रकाशात जा. कॅफीन आणि मिठाचा वापर नियंत्रित करा. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियम वाढण्यास मदत होईल आणि तुमची हाडं सुरक्षित राहतील.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bone Health : तिशीनंतर महिलांनी या 5 त्रासांकडे दुर्लक्ष करू नका! वेळीच सावरा, नाहीतर कमकुवत होतील हाडं