TRENDING:

पती, पत्नी आणि ती! विजय-संगीताच्या 27 वर्षांच्या संसारात कोणाची एन्ट्री, अभिनेत्याच्या बायकोने घटस्फोटाच्या अर्जात सगळंच सांगितलं

Last Updated:
Thalapathy Vijay-Sangeetha Divorce: संगीताच्या दाव्यानुसार, २०२१ पासून विजयच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली, ज्याबद्दल वारंवार सांगूनही विजयने स्वतःला बदललं नाही. उलट, यामुळे दोघांमधील दुरावा वाढत गेला.
advertisement
1/10
पती, पत्नी आणि ती! विजय-संगीताच्या 27 वर्षांच्या संसारात कोणाची एन्ट्री, अभिनेत्
सिनेमाच्या पडद्यावर शत्रूंना धूळ चारणारा थलापथी विजय (Thalapathy Vijay) खऱ्या आयुष्यात मात्र एका अशा चक्रव्यूहात अडकला आहे, जिथून बाहेर पडणं त्याला कठीण जातंय. गेल्या काही वर्षांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत वळण मिळालं आहे.
advertisement
2/10
विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने अखेर टोकाचं पाऊल उचलत चेन्नईच्या चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली आहे. या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही एकच खळबळ माजली आहे.
advertisement
3/10
एकेकाळी आदर्श जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय आणि संगीता यांच्या संसाराला कुणाची नजर लागली? संगीताने कोर्टात दाखल केलेल्या अर्जात अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत. तिने विजयवर विवाहबाह्य संबंध आणि भावनिक छळ केल्याचा ठपका ठेवला आहे.
advertisement
4/10
संगीताच्या दाव्यानुसार, २०२१ पासून विजयच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली, ज्याबद्दल वारंवार सांगूनही विजयने स्वतःला बदललं नाही. उलट, यामुळे दोघांमधील दुरावा वाढत गेला आणि संगीताला घरातच उपऱ्यासारखं जगणं भाग पडलं.
advertisement
5/10
या वादाच्या केंद्रस्थानी अभिनेत्री तृषा कृष्णन हिचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. जून २०२४ मध्ये विजयच्या वाढदिवसाला तृषाने एक 'मिरर सेल्फी' पोस्ट केला होता. त्या फोटोमधील त्यांची जवळीक आणि तृषाने वापरलेले हार्ट व इन्फिनिटी इमोजी यांनी सोशल मीडियावर आगीत तेल ओतण्याचं काम केलं.
advertisement
6/10
इतकंच नाही, तर काही महिन्यांपूर्वी कीर्ती सुरेशच्या लग्नासाठी हे दोघं एकाच खासगी विमानाने गोव्याला गेल्याचे फोटोही समोर आले होते. याच फोटोंनी संगीताच्या संशयाला पुष्टी दिली आणि संसाराची विण विस्कटली.
advertisement
7/10
मिळालेल्या माहितीनुसार, विजय आणि संगीता गेल्या दोन वर्षांपासून एकाच छताखाली राहत नाहीत. संगीता आपल्या मुलांच्या शिक्षणाचं निमित्त करून लंडनमध्ये आपल्या माहेरी स्थायिक झाली आहे.
advertisement
8/10
२५ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये मोठ्या थाटामाटात झालेलं हे लग्न आता एका वळणावर येऊन थांबलं आहे, जिथे परतीचे सर्व मार्ग बंद झाल्याचं दिसतंय. जॅसन आणि दिव्या या दोन मुलांचं भविष्य आणि वडिलांची प्रतिमा सध्या पणाला लागली आहे.
advertisement
9/10
विजयने नुकताच आपला राजकीय पक्ष 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) स्थापन केला असून २०२६ च्या निवडणुकीसाठी तो सज्ज झाला आहे. अशातच कौटुंबिक न्यायालयातून मिळालेली ही नोटीस त्याच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
advertisement
10/10
२० एप्रिल रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार असून, लोकांचा नेता म्हणून ओळखला जाणारा विजय आता कोर्टात आपली बाजू कशी मांडतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पती, पत्नी आणि ती! विजय-संगीताच्या 27 वर्षांच्या संसारात कोणाची एन्ट्री, अभिनेत्याच्या बायकोने घटस्फोटाच्या अर्जात सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल