The 50 मध्ये दणकून खेळला, बाहेर येताच हॉस्पिटल गाठलं; रजत दलालला नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
The 50 शोमध्ये खेळत असलेल्या रजत दलालला बाहेर येताच हॉस्पिटल गाठावं लागलं आहे. The 50 च्या घरात नेमकं काय घडलं हे त्याने सांगितलं.
advertisement
1/8

The 50 हा रिअलिटी शो सुरू आहे. या शोला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोचं संपूर्ण शूटींग झालं आहे. सगळे स्पर्धक The 50 च्या घरातून बाहेर आले आहेत.
advertisement
2/8
दरम्यान घरातील एका स्पर्धकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. The 50 मध्ये तो दणकून खेळला मात्र बाहेर आल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली.
advertisement
3/8
The 50 मध्ये सगळ्यांना नडणारा बिग बॉस फेम रजत दलालने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे जी पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. The 50 च्या घरात रजत दलालला मोठा दुखापत झाली. मात्र तरी त्याने शो सोडला नाही. तो शेवटपर्यंत खेळत राहिला.
advertisement
4/8
The 50 शो संपल्यानंतर रजतने थेट हॉस्पिटल गाठलं. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करण्यात आली. त्याने हॉस्पिटल बेडवरील त्याचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
5/8
गिर गिर के ही इन्सान उठना सिकता हैं, असं कॅप्शन देत रजतने फोटो शेअर केला आहे. त्याच्या उजव्या हाताची सर्जरी झाली असून त्या हाताला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. रजतचा फोटो पाहून The 50 च्या स्पर्धकांनी त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
advertisement
6/8
रजतने रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याचा एमआरआय रिपोर्ट देखील होता. शो दरम्यान नेमके काय घडले ते स्पष्ट केले. त्याच्या उजव्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. ट्रायसेप्स टेंडनच्या पार्श्व तंतूंच्या टेंडन भागात पूर्ण जाडीचा फाटलेला भाग आहे, ज्यामध्ये सुमारे 3 सेंटीमीटरपर्यंत फाटलेले तंतू अरुंद झाले आहेत."
advertisement
7/8
व्हिडिओमध्ये बोलताना रजतने सांगितलं की, "The 50च्या शूटींगच्या पहिल्याच दिवशी त्याला दुखापत झाली. वेदना असूनही तो टास्कमध्ये भाग घेत राहिला आणि सर्जरी करण्याआधी त्याने शो पूर्ण केला."
advertisement
8/8
"आता लोक विचारत आहेत की काय झाले. डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच सर्जरी करावी लागेल असं सांगितलं होतं. परंतु शो आणि कमिटमेंटमुळे मी शो पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. "सर्जरी नीट झाल्याचंही रजनते सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
The 50 मध्ये दणकून खेळला, बाहेर येताच हॉस्पिटल गाठलं; रजत दलालला नेमकं झालं काय?