TRENDING:

नागपूरच्या पोट्यांनी जिंकली MasterChef India 9 ची ट्रॉफी, असं काय बनवलं जे खाऊन परिक्षक पडले प्रेमात

Last Updated:
नागपूरचे विक्रम आणि अजिंक्य गांधी यांनी MasterChef India 9 जिंकले. त्यांनी फिनालेमध्ये अशी कोणती डिश बनवली ज्यामुळे परिक्षक त्यांना विजेते होण्यापासून थांबवू शकले नाहीत.
advertisement
1/8
नागपूरच्या पोट्यांनी जिंकली MasterChef India 9 ची ट्रॉफी!
कोण म्हणत फक्त महिलाच चांगलं जेवण बनवू शकतात. नागपूरच्या दोन पोट्यांनी त्यांच्या जेवणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
2/8
टेलिव्हिजनवर सध्या अनेक रिअलिटी शो सुरू आहेत. त्यात मास्टर शेफ इंडिया 9 देखील आहे. या शोचा नुकताच ग्रँड फिनाले झाला आणि नागपूरमधील विक्रम आणि अजिंक्य गांधी या भावांनी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
advertisement
3/8
MasterChef India च्या 9 व्या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये त्यांनी चव, प्रेझेटेशन आणि टेकनिकचा उत्कृष्ट संगम दाखवत नागपूरच्या भावांनी प्रेक्षकांची आणि जजेसची मनं जिंकली. विक्रम आणि अजिंक्य यांनी तयार केलेल्या डिशेस जजही पाहतच राहिले.
advertisement
4/8
भारतीय पारंपरिक चवींना थोडा आधुनिक टच देऊन दोघांनी पदार्थ बनवले. या विजयानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून या भावांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
5/8
यंदाच्या मास्टरशेफ सीझनमध्ये पहिल्यांदाच जोड़ी फॉरमॅट आणण्यात आला होता. स्पर्धकांनी आपल्या पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्यासोबत स्पर्धेत भाग घ्यावा लागला. देशभरातून अनेक जोड्या या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण सीझनभर आपल्या कामगिरीमुळे विक्रम आणि अजिंक्य यांनी वेगळी छाप पाडली.
advertisement
6/8
मास्टर शेफ जिंकल्यानंतर विक्रम आणि अजिंक्य यांना गोल्डन शेफ कोट देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना 25 लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. ग्रँड फिनालेमध्ये एकूण तीन दमदार जोड्यांमध्ये अंतिम लढत रंगली होती.
advertisement
7/8
या स्पर्धेत नागपूरचे विक्रम आणि अजिंक्य गांधी विजेते ठरले. ओडिशातील बहिणी अंजू आणि मंजू या पहिल्या रनर-अप ठरल्या तर साई श्री आणि त्यांची आई चंदना यांनी सेकंड रनर-अपचा मान पटकावला.
advertisement
8/8
विक्रम आणि अजिंक्य यांनी फिनालेमध्ये 'यिन यांग' (Yin Yang) ही डिश बनवून जजेसची मनं जिंकली. त्यांचं खूप कौतुक झालं. याशिवाय त्यांनी ग्रीन एप्पल अँड फेनेल (Green Apple and Fennel) आणि फ्लेवर्स ऑफ मुंबई (Flavours of Mumbai) यांसारख्या क्रिएटिव्ह डिशेस तयार करूनही परीक्षकांची मनं जिंकली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नागपूरच्या पोट्यांनी जिंकली MasterChef India 9 ची ट्रॉफी, असं काय बनवलं जे खाऊन परिक्षक पडले प्रेमात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल