TRENDING:

Dhurandhar Movie Banned: पाकिस्तानसाठी कळवळा! या देशांनी बॅन केला रणवीर सिंगचा Dhurandhar, कारण काय माहितीए?

Last Updated:
Dhurandhar Movie Banned: 'धुरंधर' ने जगभरात २६८ कोटींची कमाई करून मोठी बाजी मारली आहे. पण या जबरदस्त यशादरम्यान एक मोठा झटका बसला आहे. सहा देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पण का?
advertisement
1/8
मिर्ची लागली! रणवीर सिंगचा 'Dhurandhar' 6 देशांमध्ये बॅन! पण कारण काय?
मुंबई: सुपरस्टार रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेला स्पाय-थ्रिलर चित्रपट 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. रिलीज होऊन आठवडा उलटायच्या आतच या चित्रपटाने जगभरात २६८ कोटींची कमाई करून मोठी बाजी मारली आहे.
advertisement
2/8
पण या जबरदस्त यशादरम्यान 'धुरंधर'ला एक मोठा झटका बसला आहे. सहा देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पण का? मिळालेल्या माहितीनुसार, बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई (UAE) या सहा महत्त्वाच्या देशांमध्ये 'धुरंधर' रिलीज झालेला नाही.
advertisement
3/8
चित्रपट बॅन होण्याचे सर्वात मोठे कारण 'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाला 'पाकिस्तान विरोधी चित्रपट' (Anti-Pakistan Film) म्हणून पाहिले जात आहे.
advertisement
4/8
याबद्दल बोलताना एका अंतर्गत सूत्राने सांगितले, "धुरंधर बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये प्रदर्शित झालेला नाही. हा चित्रपट 'पाकिस्तान विरोधी' असल्याच्या भीतीने हे घडण्याची शक्यता होतीच. यापूर्वीही अशा विषयांवरील चित्रपटांना या भागात रिलीज करता आलेलं नाही. तरीही 'धुरंधर'च्या टीमने प्रयत्न केले, पण दुर्दैवाने या सर्व देशांनी चित्रपटाच्या कथेला मंजुरी दिली नाही."
advertisement
5/8
या बंदीमुळे चित्रपटाच्या विदेशातील कलेक्शनवर मोठा फरक पडणार आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन खूप जास्त असू शकले असते, पण आता हे शक्य होणार नाही. तरीही, रिलीजच्या एका आठवड्याच्या आतच 'धुरंधर'ने ४४ कोटी विदेशातून कमावले आहेत, पण या बंदीमुळे मोठी कमाई गमावली आहे.
advertisement
6/8
'धुरंधर'ची कथा एका भारतीय अधिकाऱ्याभोवती फिरते, जो पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड आणि राजकारणात घुसखोरी करतो. हा चित्रपट भारताची गुप्तचर संस्था 'रॉ' आणि 'ऑपरेशन लियारी'सारख्या वास्तविक भू-राजकीय संघर्षांवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे.
advertisement
7/8
या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना (रेहमान डकैत), संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे तगडे कलाकार आहेत.
advertisement
8/8
गल्फ देशांमध्ये एखाद्या भारतीय चित्रपटाला बंदीची झळ बसण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर', सलमान खानचा 'टायगर ३' आणि अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' यांसारख्या मोठ्या चित्रपटांनाही या देशांमध्ये प्रदर्शनाची परवानगी मिळाली नव्हती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar Movie Banned: पाकिस्तानसाठी कळवळा! या देशांनी बॅन केला रणवीर सिंगचा Dhurandhar, कारण काय माहितीए?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल