'याचं मूळ माझी आईच!' Bigg Boss 19 फेम तान्या मित्तल करते काळी जादू? बसीर अलीच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Tanya Mittal: बसीर अलीने एका मुलाखतीत थेट दावा केला होता की, "तान्या मित्तल काळी जादू करते!" या आरोपांवर खुद्द तान्या मित्तलने मौन सोडले आहे.
advertisement
1/8

मुंबई: टीव्ही जगात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती 'बिग बॉस १९' मध्ये दिसलेल्या तान्या मित्तलची! शोमधून बाहेर पडल्यापासून तान्या एकामागून एक बॉम्ब फोडत आहे. पण नुकतंच एका स्पर्धकाने तिच्यावर केलेले आरोप ऐकून प्रेक्षकांना मोठा शॉक बसला होता.
advertisement
2/8
घरातील तिचा सहस्पर्धक बसीर अली याने एका मुलाखतीत थेट दावा केला होता की, "तान्या मित्तल काळी जादू करते!" बसीरच्या म्हणण्यानुसार, शोदरम्यान तान्याने त्याची एक फोटो हातात घेऊन त्यावर हात फिरवला आणि काहीतरी पुटपुटून त्यावर फुंकर मारली होती. हा दावा ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
3/8
आता या भयंकर आरोपांवर खुद्द तान्या मित्तलने मौन सोडले आहे. 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत तान्याने या आरोपांवर हसून जे उत्तर दिले, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
advertisement
4/8
तान्या म्हणाली, "मी घरातून बाहेर आल्यावर मला माझ्या टीमने सांगितले की लोक माझ्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलत आहेत. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, की माझ्या जवळ निगेटिव्हिटी आणू नका!"
advertisement
5/8
पुढे, काळ्या जादूच्या आरोपांवर तान्याने थेट मिश्किल टोला लगावला. "मला जादू करायला येते! हो, मीच केली आहे जादू! अख्खा देश आणि संपूर्ण घर फक्त माझ्याबद्दलच बोलत असेल, तर याचा अर्थ मी काहीतरी जादू नक्कीच केली आहे."
advertisement
6/8
तान्याने थेट आपल्या आईलाच या जादूच्या ज्ञानासाठी दोषी ठरवले. ती हसत-हसत म्हणाली, "काळी, पिवळी, निळी जादू करायची राहून गेली तर मी आता पुन्हा घरी जाते आहे आणि याबद्दल माझ्या आईशी बोलणार आहे. माझी आईच या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे! तिने मला हे सगळं का नाही शिकवलं?"
advertisement
7/8
ती पुढे म्हणाली, "आईमुळेच मी अजूनही सोफ्यावर बसते आणि ती खाली जमिनीवर बसते. काय शिकवलं आहे मला माहिती नाही. आतापर्यंत मी फक्त 'जय श्री राम' करत आहे. मला वाटतं माझ्या संस्कारांमध्ये काहीतरी लेफ्ट-राईट झाले आहे. आता मी घरी जाऊन ब्लॅक मॅजिक शिकणार!"
advertisement
8/8
तान्या मित्तल नुकतीच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱ्या तान्याने, मात्र शो संपताच तिची खास मैत्रीण नीलम गिरीला सोशल मीडियावर अनफॉलो करून वादाला तोंड फोडले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'याचं मूळ माझी आईच!' Bigg Boss 19 फेम तान्या मित्तल करते काळी जादू? बसीर अलीच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर