TRENDING:

'कदाचित हा माझा शेवटचा मेसेज...', दुबईहून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा VIDEO

Last Updated:
मुलीसोबत दुबईत गेलेल्या या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच दुबईहून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तिने तिथल्या भयानक परिस्थितीबाबत सांगितलं होतं.
advertisement
1/7
'कदाचित हा माझा शेवटचा मेसेज...', दुबईहून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा VIDEO
अमेरिका, इराण, इस्राइल यांच्यातील संघर्षाची परिणाम दुबईतही दिसतो आहे. भारतातील कित्येक सेलिब्रिटीही दुबईत अडकले. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता. जी तिची 14 वर्षांची मुली सायरासोबत दुबईत अडकली होती.
advertisement
2/7
लाराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दुबईतील तिचा भयानक अनुभव मांडला. लाराने सांगितलं, "जेबेल अली बंदर जिथं सतत बॉम्ब हल्ले होत आहेत, तिथपासून 10 किमी अंतरावर त्यांचं घर आहे. अशा परिस्थितीत तिने भारतात तिच्या कुटुंबाकडे परतण्याचा धोका पत्करला. तिला फुजैराहला पोहोचण्यासाठी 2 तासांचा प्रवास करावा लागला. हा प्रवास भयानक होता"
advertisement
3/7
लारा म्हणाली, "फुजैराह बंदर आणि तेल शुद्धीकरण कारखान्यावर आदल्या दिवशी हल्ला झाला होता.  विमानतळावर स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. दुसऱ्या बाजूला काय चाललं आहे याची काहीच कल्पना नव्हती, यूएईमधील लोकांनी यापूर्वी कधीही असं काही अनुभवलं नव्हतं. आता हल्ला होऊ नये, अशीच प्रार्थना सगळे करत होते"
advertisement
4/7
लारा दत्ता गेल्या तीन वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. तिची मुलगी तिथे एका प्रसिद्ध टेनिस प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेत होती. त्यावेळी तिचा पती महेश भूपती कामासाठी लंडनमध्ये होता.
advertisement
5/7
लाराने दुबईहून 4 मार्च रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर तिथल्या परिस्थितीचं वर्णन करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओबाबत ती म्हणाली, "मी तो व्हिडिओ पोस्ट केला कारण त्यावेळी परिस्थिती खूपच अनिश्चित होती. कदाचित हा माझा शेवटचा मेसेज असेल असं मला वाटलं होतं..."
advertisement
6/7
लारा विनोदाने म्हणाली की तिने 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातील तिचा को-स्टार अक्षय कुमारला सांगितलं की तिला ती एअरलिफ्ट 2 चा भाग असल्यासारखं वाटलं.
advertisement
7/7
लाराने दुबईतील आपला हा भयानक अनुभव आणि तिथून पोस्ट केलेल्या व्हिडीओ यामागील कारण हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.  ती आणि तिची मुलगी दोघंही भारतात सुखरूप आले. त्यानंतर तिने आपला हा अनुभव सांगितला. लारा लवकरच अहमद खानच्या 'वेलकम टू द जंगल' या फिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कदाचित हा माझा शेवटचा मेसेज...', दुबईहून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल