'ती सध्या काय करते'मधील छोट्या तेजश्री प्रधानला काय झालंय? अनेक दिवस गायब, केसही कापले, चाहते चिंतेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'ती सध्या काय करते या' सिनेमातील छोटी तेजश्री प्रधान आठवतेय. बालकलाकार निर्मोही अग्निहोत्रीचा शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. तिला नेमकं काय झालं आहे?
advertisement
1/10

मराठी सिनेमा </a>आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिलं प्रेम, आठवणी आणि आयुष्यात पुढे निघून जाणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडणारा हा सिनेमा आहे." width="1600" height="900" /> 2017 साली रिलीज झालेला ती सध्या काय करते? हा मराठी सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिलं प्रेम, आठवणी आणि आयुष्यात पुढे निघून जाणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडणारा हा सिनेमा आहे.
advertisement
2/10
फक्त तरूणाईलाच नाही तर प्रत्येक वयागटातील लोकांना या सिनेमानं भुरळ घातली. सिनेमातील तन्वी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येऊन गेलेली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधाननं या सिनेमात तन्वीची भूमिका साकारली होती.
advertisement
3/10
तर किशोरवयीन तन्वी म्हणून आर्या आंबेकर झळकली होती आणि तन्वीच्या बालपणीची भूमिका ही बालकलाकार निर्मोही अग्निहोत्री हिनं साकारली होती.
advertisement
4/10
निर्मोही अग्निहोत्रीने या सिनेमातून छोट्या तन्वीची निरागस भूमिका साकारून खूप लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयाला प्रेक्षाकांची दाद मिळाली. विशेष म्हणजे हा तिच्या कारकिर्दीतील एकमेव सिनेमा ठरला. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर होती. पण कलाक्षेत्राशी तिचं नातं कायम होतं. निर्मोही कथ्थक नृत्यांगणा आहे. ती विविध नाट्यप्रयोगांमधूनही काम करत असल्याचं समजतं.
advertisement
5/10
सोशल मीडियावर ती तिच्या कथ्थक नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या नृत्याला चाहत्यांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र गेल्या चार महिन्यांपासून ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. त्यानंतर ती पहिल्यांदा समोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. काही दिवसांआधीच निर्मोहीनं शेअर केलेले दोन व्हिडीओ चर्चेत आले.
advertisement
6/10
या व्हिडीओंमध्ये निर्मोहीचे केस पूर्णपणे कापलेले दिसत आहेत. निर्मोहीला काही झालं आहे अशी काळजी चाहते व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत तिच्या तब्येतीबद्दल विचारणा केली आहे.
advertisement
7/10
तिच्या या लूकमागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. निर्मोहीची तब्येत ठीक नसेल किंवा हा तिच्या नव्या प्रोजेक्टमधील लुक असावा अशाही चर्चा सुरू आहेत.
advertisement
8/10
निर्मोहिच्या सोशल मीडियावर तिचा शेवटचा व्हिडीओ हा सप्टेंबर 2025 चा आहे. त्यानंतर तिनं 13 फेब्रुवारीला तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. म्हणजेच चार महिने ती सोशल मीडियापासूनही दूर होती.
advertisement
9/10
'ती सध्या काय करते?' मधील छोटी तन्वी आजही प्रेक्षकांना आवडते. तन्वी आणि अनुरागची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
10/10
छोट्या तन्वीची भूमिका निर्मोहीनं साकारली होती तर छोटा अनुराग हा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा मुलगा होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती सध्या काय करते'मधील छोट्या तेजश्री प्रधानला काय झालंय? अनेक दिवस गायब, केसही कापले, चाहते चिंतेत