Dhurandhar Movie Records: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’चा जलवा! ओटीटी रिलीजनंतरही थिएटरमध्ये बनवले 3 रेकॉर्ड
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केल्यानंतर ओटीटीवरही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग चित्रपटामध्ये 'धुरंदर'चा टॉप 10 च्या यादीमध्ये समावेश झाला होता. चित्रपटाने रिलीज होऊन 75 दिवस झालेले आहेत. अशातच आता चित्रपटाने तब्बल तीन रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले आहेत.
advertisement
1/7

रणवीर सिंगच्या 'धुरंदर' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ कायम आहे. डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाने देशासह परदेशामध्ये जोरदार कमाई केलेली आहे. भारतामध्ये चित्रपटाने 800 कोटींहून अधिकची कमाई तर, जगभरामध्ये 1300 कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे.
advertisement
2/7
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केल्यानंतर ओटीटीवरही चित्रपट चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग चित्रपटामध्ये 'धुरंदर'चा टॉप 10 च्या यादीमध्ये समावेश झाला होता. चित्रपटाने रिलीज होऊन 75 दिवस झालेले आहेत. अशातच आता चित्रपटाने तब्बल तीन रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले आहेत.
advertisement
3/7
5 डिसेंबर 2025 रोजी भारतासह संपूर्ण जगभरामध्ये रिलीज झालेला 'धुरंदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 दिवस पूर्ण केलेले आहेत. हा चित्रपटाने केलेला फर्स्ट रेकॉर्ड आहे.
advertisement
4/7
'धुरंदर' चित्रपटाने भारतामध्ये चित्रपटाने 800 कोटींहून अधिकची कमाई तर, जगभरामध्ये 1300 कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. भारतामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये अव्वल ठरला आहे.
advertisement
5/7
रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने 'जवान' आणि 'पुष्पा'चाही रेकॉर्ड मोडित काढला आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती झालेल्या चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर सक्सेस मिळवले आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्यामध्ये दुसरा रेकॉर्ड प्रस्थापित केला.
advertisement
6/7
तिसऱ्या आणि शेवटच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, 30 जानेवारी 2026 रोजी 'धुरंदर' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर आला आहे. तरीही सुद्धा ह्या चित्रपटाने थिएटरमध्ये आपले स्थान कायमचे सिद्ध करून ठेवले आहे. 'धुरंदर' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर 10 कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे.
advertisement
7/7
आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर' चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 रोजी देशभरासह संपूर्ण जगभरात रिलीज झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar Movie Records: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’चा जलवा! ओटीटी रिलीजनंतरही थिएटरमध्ये बनवले 3 रेकॉर्ड