मेगाब्लॉकमुळे घरीच आहात? मग OTTवर करा टाइमपास, पाहा या 5 फिल्म्स आणि वेब सीरिज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
New Movies-Web Series Releasing On OTT: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला ब्रेक देण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर अनेकांनी घरातून काम करणं पसंत केलं आहे. मेगा ब्लॉकमुळे घरी आहात तर OTT वर मनोरंजन करुन घ्या.
advertisement
1/6

जूनच्या पहिल्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कॉन्टेंट रिलीज होतोय. ज्यात 'गुनाह' 'उप्पू पुली करम' आणि 'एरिक' सारखे शो पाहायला मिळणार आहेत.
advertisement
2/6
'एरिक' ही 1980 च्या न्यूयॉर्कमधील एक इमोशनल आणि थ्रिलर सीरिज आहे. ज्यात एक बाप आपल्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा शोध घेत आहे. ही सीरिज तुम्ही Netflix वर पाहू शकता.
advertisement
3/6
'द प्राइस ऑफ नोना इनहेरिटन्स' या सिनेमात ख्रिश्चन डी सिका, डार्को पेरिक, अँटोनिनो ब्रुशेटा आणि अँजेला फिनोचियारो हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. हा सिनेमा 4 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
advertisement
4/6
अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुरभी ज्योती स्टारर यांनी गुनाह ही फुल्ल ड्रामा असलेली वेब सिरीज आहे. गश्मीर यात अँटी हिरोची भूमिका साकारत आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार 3 जूनला रिलीज होणार आहे.
advertisement
5/6
झेवियर जेन्स दिग्दर्शित 'अंडर पॅरिस' या सिनेमात बेरेनिस बेजोने सोफिया यांची प्रमुख भुमिका आहे. 5 जूनला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
advertisement
6/6
दीपिका वेंकटचलम, वनिता कृष्णचंद्रन, आयशा जीनत, नवीन कुमार, राज अयप्पा, अश्विनी आनंदिता आणि पोनवन्नन अशी दमदार स्टारकास्ट असलेली 'उप्पू पुली करम' ही तमिळ सीरिज आहे. सीरिज हिंदीतही पाहू शकताय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 30 मे ला हा सीरिज रिलीज झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मेगाब्लॉकमुळे घरीच आहात? मग OTTवर करा टाइमपास, पाहा या 5 फिल्म्स आणि वेब सीरिज